शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर अंगणवाडीतील बालकांना १५ मेपर्यंत पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 15:48 IST

बंदच्या काळात बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने १५ मेपर्यंत पोषण आहार वाटप करण्याचे आदेश महिला व बालकल्याण विभागाला दिले आहे.

ठळक मुद्दे१६ हजार बालकांना मिळणार लाभवाटप सुरूबालविकास प्रकल्प अधिकारी यांची माहिती, नियमाने वाटप करण्याचे निर्देश

(सय्यद लियाकत/मोहन सारस्वत)जामनेर, जि.जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालय व अंगणवाड्या बंद करण्यात आल्या आहेत. बंदच्या काळात बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने १५ मेपर्यंत पोषण आहार वाटप करण्याचे आदेश महिला व बालकल्याण विभागाला दिले आहे. त्यानुसार तालुक्यातील प्रकल्प एक व प्रकल्प दोनमधील ३९६ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे सदर पोषण आहार बालकाच्या पालकाला बोलून सोशल डिस्टंसिंगचे पालन करून दिला जाणार असून शून्य ते सहा वयोगटातील १६ हजार बालकांना याचा लाभ मिळणार आहे.कोरोनाने देशात व राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामुळे राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्यादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशावेळी अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी शासनाने लॉकडाऊनच्या काळातही बालकांना पोषण आहार देण्याचे निर्णय घेतला आहे. हा पोषण आहार अंगणवाडीत शिजवून दिला जाणार नसून, तो वाटप केला जाणार आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात पोषण आहार वाटप करण्याचे काम सुरू झाले आहेत १५ मेपर्यंत हा पोषण आहार वाटप केला जाणार आहे. बालकाच्या पालकाना बोलून डाळी, धान्य, तेल, मीठ, गहू, तांदूळ आदींची पाकिटे दिली जाणार आहे.सरकारचा ‘टेक होम रेशन उपक्रम’संचारबंदीच्या काळात राज्य शासनाने ‘टेक होम रेशन’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बालकांना दिलेला पोषण आहार घरीच तयार करून त्यांना खाऊ घालण्याचे आदेशही दिले आहेत. तालुक्यात प्रकल्प एक, प्रकल्प दोन अशा एकूण ३९६ अंगणवाड्या आहेत. सर्व अंगणवाड्यांमध्ये बालकांना पोषण आहार वाटपाचे निर्देश देण्यात आले आहे.शासनाने बालकांना पोषण आहार वाटपाचे आदेश दिले आहेत. पालकांना बोलावून नियमांचे उल्लंघन न होता सदर पोषण आहार वाटपाचे काम सुरू करण्यात आले आहे. १५ मेपर्यंत सर्व बालकांना पोषण आहार दिला जाणार आहे. अंगणवाडी सेविकेने नियमाचे पालन करून पोषण आहार वाटप करावा.-ईश्वर गोयर, बालविकास प्रकल्प अधिकारी, जामनेर

टॅग्स :SchoolशाळाJamnerजामनेर