शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावातील ‘बेलगंगे’च्या साखरेने नूतन वर्षाचे तोंड गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 01:20 IST

१० वर्षानंतर यावर्षी प्रथमच बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरल्याने रविवारी उत्पादीत झालेल्या यंदाच्या गाळप हंगामातील साखरेचे पूजन अंबाजी ग्रुपचे संचालक व उद्योगपती प्रवीण पटेल यांच्याहस्ते झाले. यावेळी एकमेकांना साखर भरवून हा सोहळा साजरा झाला.

ठळक मुद्दे१० वर्षांनंतर प्रथमच पूजनउत्पादीत झाली साखरसंचालक मंडळासह कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आनंद

चाळीसगाव, जि.जळगाव : १० वर्षानंतर यावर्षी प्रथमच बेलगंगा साखर कारखान्याची चाके फिरल्याने रविवारी उत्पादीत झालेल्या यंदाच्या गाळप हंगामातील साखरेचे पूजन अंबाजी ग्रुपचे संचालक व उद्योगपती प्रवीण पटेल यांच्याहस्ते झाले. यावेळी एकमेकांना साखर भरवून हा सोहळा साजरा झाला. भूमीपुत्रांनी मोठ्या नेटाने कारखाना सुरू करुन चाळीसगावकरांना नूतन वर्षाची गोड भेट दिल्याची प्रतिक्रिया चेअरमन चित्रसेन पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.१० वर्षे बंद असलेला बेलगंगा साखर कारखाना भूमीपुत्रांनी एकत्र येऊन लोकसहभागातून विकत घेतला. ७ रोजी गव्हाणीत ऊस मोळी टाकण्याचा शुभारंभ माजी मंत्री एकनाथराव खडसे, सुरेशदादा जैन, डॉ.रणजीत पाटील, डॉ.सतीष पाटील, गुलाबराव पाटील, शिरीष चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.ट्रायल सीझनमधील पहिल्या साखरेचे यशस्वी उत्पादन रविवारी हाती आले. ऊसाच्या रसापासून साखर होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने संचालक मंडळासह कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला.यावेळी अंबाजी ग्रुपचे संचालक दिलीप चौधरी, प्रेमचंद खिंवसरा, विजय अग्रवाल, दिनेश पटेल, किरण देशमुख, रवींद्र केदारसिंग पाटील, नीलेश निकम, डॉ.अभिजीत पाटील, सुशील जैन, अजय शुक्ल, विनायक वाघ, उद्धवराव महाजन, अशोक ब्राम्हणकार, राजेंद्र धामणे आदी उपस्थित होते.गाळप हंगामाला दीड महिना उशिराने सुरुवात झाल्याने यंदाचा हा ट्रायल सीझन आहे. १० वर्षानंतर पहिल्यांदाच साखरेचे यशस्वी उत्पादन झाले याचा आनंद आहे. पुढील हंगाम वेळेवर सुरु होईल.- चित्रसेन पाटील, चेअरमन, बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेChalisgaonचाळीसगाव