शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणी गावाकडे, ‘नर्सिंग’च्या विद्यार्थिनीची खोलीत आत्महत्या; शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी

By विजय.सैतवाल | Updated: April 7, 2024 21:15 IST

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव : शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षाची विद्यार्थिनी करुणा संतोष बोदडे (२२, रा. वढोदा ता.यावल, ह.मु. दीक्षितवाडी, जळगाव) हिने राहत्या खोलीमध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. मैत्रिणी गावाकडे गेलेल्या असल्याने खोलीत एकटी असतानाच करुणाने हा टोकाचा निर्णय घेतला. ही धक्कादायक घटना रविवार, ७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मूळची यावल तालुक्यातील वढोदा येथील रहिवासी असलेली करुणा बोदडे ही विद्यार्थिनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयात (नर्सिंग) पदव्युत्तरचे (जीएनएम) शिक्षण घेत होती. ती अन्य तीन मैत्रिणींसह दीक्षितवाडीमधील वानखेडे इमारतीमध्ये भाडे तत्वावरील खोलीत राहत होती. यामधील तीन विद्यार्थिनी सुटी असल्याने गावाकडे गेल्या होत्या. 

खोलीवर एकट्याच असलेल्या करुणाने दुपारी दीड वाजेच्या सुमारास जेवण केले त्यानंतर पाणी भरले, असे घरमालक महिलेने सांगितले. मैत्रिणीला दिसली गळफास घेतलेल्या अवस्थेतरविवारी संध्याकाळी करुणाची एक मैत्रिण जळगावात परतली, त्या वेळी तिने दरवाजा ठोठावला. मात्र बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने तिने घरमालक महिलेला सांगितले. त्यांनी खोलीच्या मागील दरवाजा उघडला असता करुणा ही गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. या विषयी जिल्हापेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. त्या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी पोहचले व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. 

दोन ओढण्यांनी घेतला गळफास

करुणाने गळफास घेण्यासाठी छताच्या ओकोड्याला दोन ओढण्या एकमेकांना बांधून गळफास घेतला. तसेच बाजूलाच गॅस सिलिंडर असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यावर उभे राहून तिने गळफास घेतल्याचा अंदाज आहे.

चार महिन्यांपूर्वीच साखरपुडा

करुणा हिचा चार महिन्यांपूर्वीच सुरत येथे होमगार्ड असलेल्या तरुणासोबत साखरपुडा झाला.  त्यानंतर तिने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला.

मैत्रिणी, कुटुंबियांचा मोठा आक्रोश

या घटनेची माहिती मिळताच करुणा ज्या भागात राहत होती, त्या भागात मैत्रिणी आल्या. त्या ठिकाणी त्यांनी मोठा आक्रोश केला. तसेच संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मयत तरुणीचे कुटुंबीय रुग्णालयात आले. त्या वेळी त्यांनीही मोठा आक्रोश केला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.