जळगाव : येथे स्वॅब घेतलेल्या ११० कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाले आहे. पैकी १०१ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर नऊ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळचे ४, यावलचे २ तर सावदा, एरंडोल व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे . जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४६८ इतकी झाली आहे.
जिल्ह्यातील बाधितांची संख्या ४६८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 21:25 IST