शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अपक्षांनीही गाठला लाखाचा आकडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:14 IST

प्रमुख पक्षांची रणनीतीही महत्त्वाची

जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता अपक्ष उमेदवार हे विजयी आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविणारा उमेदवार यांच्यासाठी फारशी डोकेदुखी ठरलेले नाही, असे गत दोन निवडणुकांवरून दिसून येते. मात्र त्यांनी गेल्या निवडणुकीत गाठलेला लाखाचा आकडा याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी प्रमुख लढत ही भाजपच्या उमेदवार- विद्यमान खासदार रक्षा खडसे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्यातच होणार आहे.२०१४ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २० उमेदवार रिंगणात होते. यात १० अपक्ष तसेच आठ इतर पक्षांचे यांच्या मतांची एकूण बेरीज जवळपास एक लाख आठ हजार १६५ होते. गत वेळी सुमारे १० लाखांवर एकूण मतदान झाले होते.त्यात अपक्ष व इतर आठ अपक्षांची मते एक लाखावर जातात. याची टक्केवारी काढल्यास जवळपास १० टक्क्यांवर जाते. परिणामी अपक्ष या मतदारसंघात विजयी होणारा आणि दुसºया क्रमांकाची मते मिळविणारा उमेदवार यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारा नसला तरी त्याकडे लक्षच द्यावेच लागणार आहे.याशिवाय याआधीच्याही २००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीतही रावेर मतदारसंघात यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. त्या वेळीही अपक्ष डझनभर उमेदवार व इतर पाच पक्ष मिळून जवळपास ९० हजारांचा आकडा पार केला होता. यामुळे या निवडणुकीत अपक्षांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी प्रमुख पक्षाचे उमेदवार कोणती नीती अवलंबतात यावरही विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव