सदस्य अगदी ओरडून ओरडून पाणी न पिता आपला मुद्दा मांडतात... बदल्यांवरून बदला घेण्यासारखी परिस्थिती झालेली असते....जे पदावर असताना बदल्यांबाबत ब्र शब्दही काढत नव्हते, ते आता आरोपांच्या फैरी झाडतात. अधिकारी येतात वादळी चर्चा होते वातावरण शांत होते...मिळाले काय काहीच नाही, कोरोनाने सर्वांचाच 'पोपट' केलाय हो..
सर्वसाधरण सभेत असाधारण घडामोडी घडतात.. एका साहेबांकडेच सर्वांच्या नजरा असतात. या अधिकाऱ्यांना व्यासपीठासमोर बोलविल्यानंतर मोठे वादळ सुरू असले तरी काय? कोठे? या प्रश्नाने त्यांची सुरूवात होते आणि प्रश्न विचारणारे कपाळाला हात मारून घेतात... त्यांच्याच बाबतीत एक भलताच किस्सा घडला. सकाळी दहाची वेळ असलेल्या बैठकीला ते पावणे दहालाच हजर ही बैठक शांततेत पार पडेल असे वाटत असताना दुसऱ्यांची मात्र, या बैठकीकडे पाठ आणि काय गैरहजर सर्वानाच तंबी, च्यामारी गेले नाही तर केवळ यांची झापाई आणि वेळेवर गेले तर इतर सर्वांची झापाई... हा कसला योगायोग..."डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डिजेला"... हे गाणं वाजावं अन् चित्रपटाच नाव लगेच ओठावर यावं...तसा काहीसा हा प्रकार...
आनंद सुरवाडे