शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, थेट घरपोच मिळणार ‘मेमो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:07 IST

‘इ चलन’ प्रणाली विकसीत

जळगाव : नव्या वर्षाची संक्रात वाहतूक नियम मोडणाºयांवर असेल. याचे कारण शहर वाहतूक शाखेकडून विकसीत होणाºया इ चलन प्रणालीमुळे नियम मोडणाºयांना आता घरपोच मेमो मिळणार असून सात दिवसात दंड भरा नाही तर कोर्टाच्या खेट्या घाला. असा प्रकार होईल. नव्या वर्षात १ जानेवारीपासून ही प्रणाली विकसीत होत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कुनगर यांनी दिली.शहरात वाहतूक नियमांना फाटा देऊन अनेक जण वाहने चालवत असतात. यात प्रामुख्याने झेब्रॉ क्रॉसिंगकडे दुर्लक्ष करून त्यापुढे वाहने लावणे, एका गाडीवर तीन ते चार जणांनी बसणे, सिग्नलची पर्वा न करता गाडी पुढे दामटणे असे प्रकार नित्त्याने सुरू असतात. शहरातील प्रमुख व वर्दळीच्या चौकांमध्ये ही परिस्थिती अगदी नित्त्याची झाली आहे.नियमांचे उल्लंघन हेचअपघाताचे प्रमुख कारणबरेच अपघात हे वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळेच होत असतात. शहरात महामार्गाला लागून असलेल्या चौकांमध्ये तर सिग्नल दुसºया दिशेचा मिळालेला असताना त्याची पर्वा न करता अनेक जण नियम धाब्यावर बसवून गाडी पुढे दामटतात. यामुळे बºयाच वेळेस अपघात होतात. महाविद्यालयीन युवकांकडून हे प्रकार सर्रास घडत असतात. याचे परिणाम सिग्नल मिळालेल्या दिशेची वाहने जोराने पुढे येतात नियम तोडणाºया दुचाकीला अपघात होतात. नियम तोडणे हे अनेक अपघातांचे प्रमुख कारण असते.यंत्रणेवर सहा कर्मचाºयांची नियुक्तीइ चलन प्रणालीसाठी खास अशा यंत्रणेसह एक मोठे मॉनेटर, प्रिंटर संगणक प्रणाली कार्यान्वीत असेल. मोठ्या मॉनेटरवर चौक व तेथील नियम तोडणाºया व्यक्तीचे छायाचित्र स्पष्टपणे दिसणार आहे. यासाठी सहा प्रशिक्षीक कर्मचाºयांची नियुक्ती केली जाणार आहे. शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयावर यासाठी टॉवर व अन्य यंत्रणा आहे.अशी आहे ‘इ चलन’ प्रणालीराज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये पोलीस प्रशासनाने इ चलन प्रणाली विकसीत केली आहे. या प्रमाणीचे नियंत्रण कक्ष हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाहतूक शाखेत असेल. पोलीस प्रशासनाने बसविलेल्या शहरातील ५६ सीसीटीव्ही कॅँमेºयांद्वारे नियम तोडणाºया वाहनाचे चित्र वाहतूक शाखेतील नियंत्रण कक्षात दिसेल. तेथील आॅपरेटर त्या गाडीच्या चित्रावर क्लिक करताच त्या वाहनधारकाच्या नावाने मेमो तयार होईल. हा मेमो दंडाच्या रकमेसह असेल. तो थेट वाहनधारकाच्या मुळ पत्त्यावर जाईल. मेमोवर त्याने नेमकी काय चुक केली याचे छायाचित्रही असेल. मेमोवरील रक्कम संबंधीत वाहन मालकाला सात दिवसांच्या आत भरावी लागेल नाहीतर हे प्रकरण सात दिवसांनंतर थेट कोर्टात जाईल. त्यानंतर वाहनमालकाला कोर्टाच्या खेट्या घालाव्या लागतील. हे टाळायचे असेल तर संबंधीत वाहन चालकास सात दिवसात दंड भरावा लागेल.नव्या वर्षापासून प्रारंभही प्रणाली नव्या वर्षात म्हणजे १ जानेवारी २०१९ पासून कार्यान्वीत होणार आहे. येत्या दोन दिवसात या प्रणालीची माहिती देणाºया डिजीटल बॅनरचे विमोचन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. वाहतूकीचे नियम तोडणाºयांना यामुळे शिस्त पाळावीच लागेल. चौकात नियम तोडणारे व वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्यात होणारे वाद, मोठ्या व्यक्तीचे फोनही यामुळे बंद होतील.वाहतूक नियमांचे शिस्तीत पालन व्हावे असा प्रयत्न आहे. त्यासाठी नव्या वर्षात ही प्रणाली कार्यान्वीत करत आहोत. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येत आहे.-देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.

टॅग्स :Jalgaonजळगाव