आता पक्ष्यांसाठी ‘ज्यूस सेंटर’, ‘चातक’चा राबवणार उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 06:52 PM2020-06-29T18:52:55+5:302020-06-29T19:00:41+5:30

वरणगाव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्था पक्ष्यांसाठी ‘ज्युस सेंटर’ हा उपक्रम राबविणार आहे

Now ‘Juice Center’ for birds, ‘Chatak’ will be implemented | आता पक्ष्यांसाठी ‘ज्यूस सेंटर’, ‘चातक’चा राबवणार उपक्रम

आता पक्ष्यांसाठी ‘ज्यूस सेंटर’, ‘चातक’चा राबवणार उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देचला लावूया ‘पक्ष्यांचे ज्युस सेंटर’ही झाडे ठरणार महत्त्वाची : पळस, पांगारा, काटेसावर

संकेत पाटील
खिर्डी, ता.रावेर, जि.जळगाव : वरणगाव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्था पक्ष्यांसाठी ‘ज्युस सेंटर’ हा उपक्रम राबविणार आहे. यात पळस, पांगारा व काटेसावर या वृक्षांचे रोपण करणे अपेक्षित आहे.
प्रत्येक जण आपापल्या सोयीने व आवडीने अन्न पदार्थ जेवताना घेत असतो वा बनवत असतो. मात्र पशु-पक्षी आपल्या आवडी निवडीचे अन्न कसे उपलब्ध करणार? तुम्ही पक्ष्यांची दाणा-पाणी, तसेच कृत्रिम घरटे तयार करून त्यांची काळजी घेतातच पण आता त्यांना नैसर्गिक खाद्य कसे मिळेल याचा विचार करून आणि कृती करणे गरजेचे आहे. मानवाला जसा प्रत्येक कृतीमध्ये वेगवेगळा आहार पाहिजे असतो त्याचप्रमाणे पक्ष्यांनाही वेगवेगळा आहार हवा असतो. उन्हाळात आपल्या शरीरातील पाणी व इतर मिनरलचे प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी आपण ज्युस पितो तसेच पक्ष्यांना पण मधुरसाची आवश्यकता असते. जे विविध झाडांच्या फुलांमधून पूर्ण करतात. जसे काटेसावर, पळस व पांगरा या झाडांच्या फुलांमधील मधुरस पक्ष्यांना व कीटकांनाही आवडतो. उन्हाळ्यात या झाडांवर पक्ष्यांचा मेळा भरलेला असतो. काही पक्षी फक्त मधुरस पिण्यासाठी येतात तर काही या फुलांवर येणारे कीटक खाण्यासाठी येतात. ही झाडे म्हणजे एकप्रकारे पक्ष्यांचे ज्युस सेंटर आहे.
पण वाढत्या या सिमेंटच्या वा क्राँक्रिटच्या जंगलातही झाडं कमी होत आहे. या पावसाळ्यातही पक्ष्यांसाठी ज्युस सेंटर लावण्याचा संकल्प चातक निसर्ग संरक्षण संस्थेने केला आहे. तेव्हा प्रत्येकाने आपापल्या भागातील मोकळ्या जागेत, गार्डन, मंदिर व शाळा-कॉलेजमध्ये घराजवळ, परसबागेत, काटेसावर, पळस व पांगरा झाडे लावण्यास सहकार्य करा, असे आवाहन चातक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
पक्ष्यांसाठी ज्यूस सेंटरच्या उपक्रमाची संकल्पना अकोला येथील पक्षीमित्र अमोल सावंत मांडली आहे. उपक्रम यशस्वीपणे राबवला असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.


आपण या उपक्रमात सहभागी होऊन झाडे लावा व झाडांचे पालकत्व घ्या व पक्ष्यांसाठी उघडा एक ज्युस सेंटर, मग तुमच्या परिसरातच दिसेल तुम्हाला पक्ष्यांची विविधता नक्कीच बघायला मिळेल.
-अनिल महाजन, पक्षी अभ्यासक, अध्यक्ष, चातक निसर्ग संवर्धन संस्था
 

Web Title: Now ‘Juice Center’ for birds, ‘Chatak’ will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.