अमळनेरला आजपासून साडेचार हजार वंचितांसाठी दोन्ही वेळ अन्नदान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 06:38 PM2020-04-05T18:38:38+5:302020-04-05T18:40:19+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेचार हजार वंचितांसाठी रविवारपासून दोन्ही वेळ दर्जेदार अन्नदान सुरू झाले आहे.

From now on, Amalner has started providing food for both the four and a half thousand children | अमळनेरला आजपासून साडेचार हजार वंचितांसाठी दोन्ही वेळ अन्नदान सुरू

अमळनेरला आजपासून साडेचार हजार वंचितांसाठी दोन्ही वेळ अन्नदान सुरू

Next
ठळक मुद्देमुंबई येथील श्री वर्धमान संस्कार धाम संस्थेचे भरीव अर्थ साहाय्यअन्नदानाआधी विविध वाड्या-वस्त्यांचे केले सर्वेक्षणअन्नदानासाठी पन्नासहून अधिक मजूर, कारागीर करतात स्वयंपाक

अमळनेर, जि.जळगाव : येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साडेचार हजार वंचितांसाठी रविवारपासून दोन्ही वेळ दर्जेदार अन्नदान सुरू झाले आहे. मुंबई येथील श्री वर्धमान संस्कार धाम या संस्थेने यासाठी भरीव अर्थसहाय्य दिले आहे. येथील पडासदळे रस्त्यावरील गो क्षेत्र संचलित भानुबेन बाबूलाल शाह गोशाळेने यासाठी पुढाकार घेतला आहे.
आमदार अनिल पाटील, आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते व काही मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील विविध वाड्या-वस्त्यांमध्ये अन्नदान करण्यात आले.
अन्नदान प्रक्रिया सुरू करण्याच्या दोन दिवस आधीच गोशाळेचे पदाधिकारी चेतन शाह, चेतन सोनार, प्रा.अशोक पवार, महेंद्र पाटील (शिरूड), राजू सेठ आदींनी जेथे अन्नदान करावयाचे आहे तेथील वंचितांचे सर्वेक्षण केले होते. एकही गोरगरीब वाडी-वस्ती त्यांनी सोडली नाही. सर्व वंचितांना कार्ड वाटप केले. कार्डावर प्रत्येक घरातील सदस्यांची संख्या व तारखेची नोंद आहे. दुपारी दर माणशी पाच पुऱ्या व पुरेशी पातळ भाजी तर रोज रात्री कढी खिचडी किंवा तत्सम मेनू असेल.
भानुबेन गोशाळेत केटरर गोपाल कुंभार व त्यांचे ५० हून अधिक कारागीर आणि मजूर सकाळपासून स्वयंपाक सुरू करतात.
आज माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष रामभाऊ संदानशिव, नगरसेवक सुरेश पाटील, प्रवीण पाठक, माया लोहेरे, मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, पंकज चौधरी, संतोष लोहेरे, राही सोनार, मोन्या सोनार व गोशाळेचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
या अन्नदानासाठी दोन दिवसांपूर्वी श्री वर्धमान संस्कार धामने साडेचार लाख रुपयांचा किराणा दिला. यानंतरही त्यांचे अर्थ साहाय्य सुरूच राहणार आहे. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी त्यांच्या वाढदिवसाचा खर्च न करता ५१ हजार रुपये दिले. भविष्यात निधीची कमतरता भासू नये यासाठी आमदार अनिल पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी स्वयोगदानासह अनेकांना शब्द टाकून ठेवला आहे. चेतन शाह यांनी आभार मानले.

Web Title: From now on, Amalner has started providing food for both the four and a half thousand children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.