शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील हॉकर्स बांधवांचा 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 12:48 IST

बैठकीत निर्णय

ठळक मुद्देमनपासमोरील उपोषणाची सांगताप्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - मनपा प्रशासनाने 21 नोव्हेंबरपासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरु केल्याच्या निषेधार्थ हॉकर्स बांधवांनी 22 नोव्हेंबरपासून मनपा समोर उपोषणास प्रारंभ केला होता. मात्र मनपा प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे शनिवारी हॉकर्स संघटनेच्या सदस्यांनी उपोषण मागे घेतले व आपल्या विविध मागण्यांसाठी 29 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.मनपा प्रशासनाने चार दिवसांपासून मनपा समोर उपोषण करणा:या हॉकर्सच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे मनपाच्या धोरणाविरोधात फेरीवाला समितीच्या सदस्यांनी शनिवारी उपोषणस्थळीच बैठक घेतली. बैठकीत हॉकर्सचा न्याय-हक्कासाठी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोर्चा काढून संबधित अधिकारी किंवा मंत्र्यांना हॉकर्सच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व फेरीवाला राष्ट्रीय समितीचे सदस्य दयाशंकर सिंह व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सलमा शेख या करणार आहेत. महाराष्ट्र शासनाने याबाबत दखल न घेतल्यास थेट दिल्लीर्पयत लढा दिला जाईल अशी भूमिका हॉकर्स बांधवांनी घेतली आहे. सोमवारी सायंकाळी सर्व हॉकर्स बांधव मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा हॉकर्स समितीकडून देण्यात आली.शनिवारी आमदार सुरेश भोळे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विकास पवार यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. आमदार सुरेश भोळे यांनी मदतीचे आश्वासन हॉकर्स बांधवांना दिले. दरम्यान, मनापाने हॉकर्स विरुद्ध हातगाडय़ा तोडत अन्यायकारक कारवाई सुरु केली आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून ही कारवाई थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर प्रमुख नीलेश पाटील यांनी केली आहे. 2 डिसेंबर र्पयत हा प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. या आहेत मागण्या महानगर पालिका प्रशासनाने शहरातील हॉकर्स विरोधात सुरु केलेली कारवाई  पथ विक्रेता कायदा 2014 चे उल्लंघन करणारी असून ती त्वरित थांबविण्यात यावी व हॉकर्सचे अतिक्रमण विभागाच्या कारावाई दरम्यान झालेले नुकसान भरून द्यावे, पथ विक्रेता कायदा 2014 च्या कलम 22 नुसार नगर पथ विक्रेता समिती निवडणूक घेवून त्वरित स्थापन करण्यात यावी,  कलम 19 माल-सामान परत मागणीचा अधिकाराचे पालन व्हावे, नोंदणीकृत फेरीवाले 1 मे 2014 च्या पूर्वीचे असून ते कायद्याने व उच्चन्यायालयाच्या आदेशान्वये संरक्षित होण्यास पात्र आहेत. त्यांना हटवू नये व संरक्षित करावे, नगरपथ विक्रेता समिती गठित करण्याचे आदेश द्यावेत. गठित करण्यात आलेल्या समितीच्या व स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार पथ विक्रेता कायदा कलम 38 नुसार विक्रीची योजना तयार करण्यात यावी.