शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर पालिकेकडून अतिक्रमणधारकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 17:39 IST

फैजपूर पालिकेने शहरातील छत्री चौकात व्यवसाय करणाऱ्या १२ व्यावसायिकांना तसेच धाडी नदीपात्रात वास्तव्य करणाºया ३० रहिवाशांना अशा एकूण ४२ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देछत्री चौकातील व्यावसायिक व धाडी नदीपात्रातील रहिवाशांचा समावेशव्यावसायिकांनी सात दिवसांच्या आत, तर नदीपात्रातील रहिवाशांनी १५ दिवसांच्या आत स्वखर्चाने अतिक्रमण काढावेअतिक्रमण न काढल्यास संबंधितांवर दाखल करणार फौजदारी गुन्हे

फैजपूर, जि.जळगाव : पालिकेने शहरातील छत्री चौकात व्यवसाय करणाऱ्या १२ व्यावसायिकांना तसेच धाडी नदीपात्रात वास्तव्य करणाºया ३० रहिवाशांना अशा एकूण ४२ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली.पालिकेकडून छत्री चौकात ७० लाख रुपये खर्चून ऐतिहासिक १९३६च्या ग्रामीण काँग्रेस अधिवेशनाचे संकल्प चित्र उभारण्यात आले आहे, पण या संकल्प चित्रासमोरच मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण रहदारीलासुद्धा अडसर ठरत आहे. त्यामुळे हा रस्ता मोकळा करून द्यावा, असे १२ व्यावसायिकांंना पालिकेने नोटिसा बजावत सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याचे सूचना केल्या आहेत.त्याचप्रमाणे धाडी नदीपात्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून अनेक जण वास्तव्य करत आहे. याच ठिकाणी पालिकेने श्रीराम टॉकीज ते लक्कड पेठपर्यंत रस्त्याचे काम सुरू केले आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कामाला अडचणी येत आहेत. हा रस्ता झाल्यास शहरातील रहदारीचा ताण कमी होऊन भेट खिरोदा रस्त्यापर्यंत अथवा लक्कड पेठमध्ये जाणाºया नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळे नदीपात्रात वास्तव्य करणाºया अशा ३० रहिवाशांनासुद्धा पालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहे. त्यांना १५ दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याचे नोटिशीत नमूद केले आहे.दरम्यान, व्यावसायिक व अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे अन्यथा पालिकेकडून अतिक्रमण काढून संबंधितांवर ती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी नोटिशीद्वारे दिली आहे. 

टॅग्स :Nagar BhavanनगरभवनFaizpurफैजपूर