शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंची बदनामी केली म्हणून एनएसयुआय जिल्हाध्यक्षांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 21:01 IST

विद्यापीठ : अन्यथा दिवाणी व फौजदारी कारवाई..

जळगाव : भुसावळ येथील पी.के. कोटेचा महाविद्यालयाच्या प्राचार्यांची मुदत संपल्यावरही विद्यापीठाने त्यांची नियुक्ती कायम ठेऊन लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोप करणाऱ्या एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना कुलगुरुंची बदनामी केली म्हणून १ कोटी रूपयांची नुकसान भरपाई अदा करावी अशी नोटीस विद्यापीठाच्यावतीने पाठविण्यात आली आहे.एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी लाखो रुपये घेऊन विद्यापीठाने मुदत संपल्यावरही डॉ.मंगला साबद्रा यांना प्राचार्य पदावरची नियुक्ती तशीच ठेवली आहे. अशा आशयाचे पत्रक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धसाठी दिले होते. त्यामध्ये या प्रकरणात कुलगुरुंशी आर्थिक देवाण-घेवाण झाली असल्याचा आरोपही केला होता. समाज माध्यमांमध्येही तशी क्लिप त्यांनी प्रसारीत केली होती. या बातमी मुळे विद्यापीठाची बदनामी केली म्हणून विद्यापीठाच्यावतीने प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांच्या स्वाक्षरीने देवेंद्र मराठे यांना ॲड. सुशील अत्रे व ॲड.निशांत अत्रे यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. विद्यापीठाची बदनामी केली म्हणून मराठे यांनी लेखी व बिनर्शत माफी मागावी, तसेच १ कोटी रूपयांची नुकसान भरपाई अदा करावी अन्यथा त्यांच्या विरुध्द दिवाणी व फौजदारी कारवाई केली जाईल असेही या नोटीस मध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव