शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना नोटीस : ५० हजाराचा जातमुचलका, दोन प्रतिष्ठितांचा जामीन घेऊन हजर रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:36 IST

कलमांमध्ये वाढ

अमळनेर : येथील भाजपा मेळाव्यात माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांना केलेल्या मारहाणीच्या घटनेचे दखल घेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यासह सात आरोपींना ५० हजाराचा जातमुचलका, दोन प्रतिष्ठांचा जामिन घेऊन हजर रहा असे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले होते मात्र ते हजर झाले नाही. रविवारी किंवा सोमवारी त्यांना हजर रहावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.भाजप- शिवसेना युतीचा गेल्या १० रोजी अमळनेरात झालेल्या संयुक्त मेळाव्यात उदय वाघ यांच्यासह सात जणांनी डॉ. बी.एस. पाटील यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे. या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी उदय वाघ यांच्यासह सातही आरोपींवर सीआरपीसी कलम १०७ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून अहवाल कार्यकारी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सादर केला आहे.सात जणांना नोटीसकार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार ज्योती देवरे यांनी सातही आरोपीना नोटीस दिली आहे. त्यात म्हटले आहे की आपणाकडून सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये , निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच जनक्षोभ वाढू नये म्हणून आपणास ही नोटीस काढण्यात येत आहे. त्यामुळे सहा महिने मुदतीचा व ५० हजार रुपये किमतीच्या जातमुचलक्याचा व दोन प्रतिष्टीत व्यक्तींचा जामीन घेऊन कार्यकारी दंडाधिकारीच्या न्यायालयात हजर राहण्याचे सूचित केले आहे.हजर झाले नाहीदरम्यान, वाघ यांना शनिवारीच हजर रहाण्याचे आदेश तहसीलदार तथा तालुका दंडाधिकाऱ्यांनी दिले होते मात्र ते हजर झाले नाही. रविवारी किंवा सोमवारी त्यांना हजर राहून जामिन घ्यावा लागेल असे सूत्रांनी सांगितले.कलमांमध्ये वाढदरम्यान, डॉ. बी.एस. पाटील यांना मारहाण प्रकरणी पूर्वी भादंवि कलम ३२३, १४३, १४७, १४९ प्रमाणे अमळनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. डॉ. बी.एस. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल होता. मात्र डॉ. बी.एस. पाटील यांच्या नाकाला झालेले फ्रॅक्चर व लिव्हरला दुखापत झाल्याचे वैद्यकीय अहवालावरून स्पष्ट झाल्याने दाखल गुन्ह्यातील कलमात वाढ करण्यात आली असून ३२५ कलम वाढविण्यात आले असल्याची माहिती अमळनेर पोलिसांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकJalgaonजळगाव