शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रशिक्षणाला दांडी ९२९ कर्मचाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:15 IST

दोन दिवसात मागितला खुलासा

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, जामनेर, एरंडोल व फैजपूर, उपविभागात झालेल्या प्रशिक्षणास ९२९ कर्मचाºयांनी दांडी मारल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन दिवसात समाधानकारक खुलास न आल्यास या कर्मचाºयांना निलंबनाची कारवाई किंवा गुन्हाही दाखल होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० हजार ३७० कर्मचारी लागणार आहेत. यासाठी जवळपास ३४ हजार कर्मचाºयांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. या कर्मचाºयांचा मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण वर्ग रविवार व सोमवार असे दोन दिवस झाला.६० कर्मचाºयांना नोटीसजळगाव ग्रामीण मतदार संघासाठी १४२५ कर्मचाºयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या कर्मचाºयांचा दोन दिवस प्रशिक्षण वर्ग भूसंपादन उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी घेतला. या प्रशिक्षणास ६० कर्मचाºयांनी कोणतेही कारण न कळविता दांडी मारली. या कर्मचाºयांना १३४ प्रमाणे नोटीस बजावण्यात येत असल्याचे राजेंद्र वाघ यांनी सांगितले.फैजपूर विभागात १२४ जणांना नोटीसरावेर लोकसभा मतदार संघांतर्गत फैजपूर येथे २२९८ कर्मचारी व अधिकाºयांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन प्रांत डॉ. अजित थोरबोले यांनी प्रशिक्षण वर्ग घेतला. या वर्गास १२४ कर्मचारी कोणतेही कारण न कळविता गैरहजर होते. त्यांना नोटीस बजावण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एरंडोल येथे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी उपस्थिती दिली. ५३ कर्मचाºयांनी प्रशिक्षणाला दांडी मारली. त्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले.जामनेरला १०३ जणांना नोटीसजामनेर येथे झालेल्या अधिकारी व कर्मचाºयांच्या प्रशिक्षणात १०३ जण गैरहजर होते. त्यांच्याकडुन खुलासा मागविण्यात येणार आहे. खुलासा न पाठविणाºयांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार नामदेव टिळेकर यांनी दिली.रविवार व सोमवार असे दोन दिवस न्यु इंग्लिश स्कुल व शालिमार चित्रपट गृहात प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व रावेर मतदार संघाचे निवडणूक अधिकारी गोरक्ष गाडीलकर, सहाय्यक अधिकारी प्रसाद मते यांनी मार्गदर्शन केले. निवडणुक कामासाठी तालुक्यात १४४५ पुरुष व २२८ महिला कर्मचायाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.जळगाव शहर मतदार संघात ४१५ कर्मचाºयांची दांडीजळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी प्रांत दिपमाला चौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण वर्ग झाला. छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात हे प्रशिक्षण झाले. यात २४४० पुरूष व १०२३ महिला कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणास ३०८ पुरूष व १०७ महिला कर्मचाºयांनी दांडी मारल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे दिपमाला चौरे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव