शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील 12 बीडीओंसह 93 ग्रामविकास अधिका-यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 12:46 IST

जि.प. सीईओंची कारवाई

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानात असमाधानकारक कामकाज93 ग्रा.पं.च्या दप्तर तपासणीचे आदेश

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27- स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयांच्या कामांमध्ये जिल्हा पिछाडीवर असताना 2017-18 या वर्षभराच्या काळात 20ही शौचालये पूर्ण न केलेल्या तब्बल 93 ग्रामसेवकांसह जिल्ह्यातील 12 गट विकास अधिका:यांना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी  26 रोजी नोटीसा बजावून तीन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. या नोटीसांमुळे   खळबळ उडाली आहे.   स्वच्छ भारत अभियानांतर्गत 26 डिसेंबर 2017 अखेर शौचालयांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच सप्टेंबरमध्येदेखील या योजनेचा आढावा घेण्यात आला होता. त्यावेळीही असमाधानकारक काम करणा:या ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही ज्या ग्रामसेवकांनी कामात सुधारणा केली नाही अशा 93 ग्रामसेवकांना आज मुख्य कार्यकारी अधिका:यांनी नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई का करू नये ? याबाबत तीन दिवसात लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे.

12 गटविकास अधिका-यांची दिरंगाईतालुक्यातील गावांमध्ये अनेक ग्रामसेवकांनी 20 पेक्षाही कमी शौचालयांचे उद्दीष्ट पूर्ण केलेले नाही. त्यानंतर वेळोवेळी आढावा बैठकीत सूचना व आदेश देऊनदेखील त्याची अंमलबजावणी झाली  नाही. या सोबतच ग्रामसेवक कामात दिरंगाई करीत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील  12  गटविकास अधिका:यांनादेखील नोटीसा बजावण्यात आल्या आहे. त्यात अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल येथील गटविकास अधिका:यांचा समावेश आहे. सर्वाधिक कमी काम चाळीसगाव तालुक्यात असल्याचे समोर आले आहे. 93 ग्रा.पं.च्या दप्तर तपासणीचे आदेशवैयक्तिक शौचालयाच्या योजनेत शासनाकडून अनुदान दिले जात असताना पात्र लाभार्थीना याचा लाभ मिळत नाही व योजनेचा उद्देश पूर्णत: साध्य झाला नाही. त्यामुळे गेल्या आठवडय़ातच विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच दप्तर तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे संबंधित 93 गावांच्या ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीचे आदेश गटविकास अधिका:यांना देण्यात आले व तपासणीचा अहवाल 3 जानेवारीर्पयत ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिका:यांकडे सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी  दिवेगावकर यांनी दिले होते.