शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

दरोडा नव्हे, विश्वस्तांमधला वाद

By admin | Updated: May 21, 2014 01:32 IST

पोलिसांचा निष्कर्ष : शिरागडमधील प्रकरणातून पुढे आलेली माहिती

यावल : तालुक्यातील शिरागडच्या सप्तशृंगीदेवीच्या मंदिरातील मारहाण करून दानपेट्या लुटल्याचा प्रकार रविवारी रात्री घडली. मात्र तो दरोडा नसून विश्वस्तांमधील अंतर्गत वादातून हा प्रकार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या प्रकरणास वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकरणात विश्वस्त असल्याचा दावा करणारे शांताराम सदू सोळंके यांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून काल रात्री अटक केली़ आरोपीस यावल न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ तालुक्यातील शिरागड येथील श्री सप्तशृंगीदेवीच्या मंदिरात रविवारी रात्री २५ ते ३० वर्षे वयोगटातील पाच-सहा अज्ञात युवकांनी रवींद्र एकनाथ पाटील (वय ३८) व पुजारी महादू मन्साराम कोळी (वय ६५) यांना लाकडी दांड्याने मारहाण करून मंदिरातील दानपेट्या फोडून रक्कम लंपास केल्याची फिर्याद पुजारी महादु कोळी यांनी दिल्याने दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता़ विश्वस्त समितीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथ पुंडलिक पाटील हे मंदिराचे विश्वस्त म्हणून काम पाहत होते. शांताराम सदू सोळंके यांनी नवीन विश्वस्त समिती स्थापन केली असून एकनाथ पुंडलिक पाटील व शांताराम सदू सोळंके यांच्यातील हा वाद गेल्या १५ वर्षापासून न्यायप्रविष्ट आहे. एकनाथ पाटील यांचे १२ जानेवारी १४ रोजी निधन झाले. तेव्हापासून एकनाथ पाटील यांचा वारस म्हणून त्यांचा मुलगा रवींद्र एकनाथ पाटील मंदिराची देखभाल पाहत होता़ परिणामी दावेदार विश्वस्त शांताराम सोळंके व रवींद्र यांच्यात बेबनाव होत होता. रवींद्र पाटील यांनी गेल्या महिन्यात यावल पोलिसांना तसे पत्रही दिले होते. दरोडेखोरांनी मंदिरातील केवळ दानपेट्या फोडल्या व रक्कम लंपास केली नाही तसेच तिघे झोपलेले असताना केवळ रवींद्र यास का मारहाण केली? यासह अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. निरीक्षक मोरे यांनी मंगळवारी शांताराम सोळंके यांच्या न्यायप्रविष्ठ असलेल्या समितीतील विश्वस्त, पुजारी महादू कोळी, भास्कर कोळी, भिका भोई यांना चौकशीसाठी बोलाविले होते, मात्र सर्वच जण ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्याकडून माहिती काढणे पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे़ रवींद्रकडे बोट दाखविणारा कोण? झोपलेल्या तिघांपैकी रवींद्रकडे बोट दाखविल्याचेही पोलिसांना सांगण्यात आले. तो बोट दाखविणारा कोण आहे ? याचाही पोलीस तपास घेत आहेत. पोलीस अधिकार्‍यांच्या भेटी अपर पोलीस अधीक्षक एन. अंबिका, उपविभागीय पोलीस उपअधीक्षक देवेंद्र शिंदे, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, सहा.पोलीस निरीक्षक अजय खर्डे, किरण शिंदे यांनी घटनास्थळी काल भेटी दिल्या़ अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर पाटील, राजू पाटील, संजय भदाणे, व्ही.व्ही.धनगर, विनोद पाटील करीत आहेत. भाविकांच्या भावनांना तडा वणी, जि़नाशिक येथील सप्तशृंगीदेवीएव्हढेच शिरागडास खान्देशवासी महत्त्व देत असल्याने दररोज शेकडो भाविक येथे हजेरी लावतात़ अनेक जण आपापल्या परीने देणगी देतात, मात्र विश्वस्तांच्या वादात आता भाविक भरडला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. (वार्ताहर)