शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासाच्या परवानगीसाठी नोडल अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:43 IST

कण्टेनमेण्ट झोनमधील नागरिकांना मात्र कोणतीही परवानगी नाही

जळगाव :  लॉकडाउनमुळे अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून ज्या नागरिकांना परराज्यात अथवा इतर जिल्ह्यामध्ये जायचे असेल त्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी नोडल अधिकाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. दरम्यान, कण्टेनमेण्ट झोनमधील नागरिकांना जाता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार गेल्या दीड महिन्यापासून अडकून पडलेल्या नागरिकांचा आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यासाठी ज्या नागरिकांना जिल्ह्णाबाहेर जायचे असेल त्यांना अर्ज करावा लागणार आहे. यासाठी आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच यासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तसेच बाहेरून जिल्ह्यात येणाºया नागरिकांच्या माहितीसाठी नोडल अधिकारी म्हणून विशेष भूसंपादन अधिकारी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आलीआहे.कण्टेनमेण्ट झोनमधील नागरिकांना पर जिल्ह्यात जाण्याची परवानगी राहणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. ज्या व्यक्तींना कोरोना किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यांनाच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल, लक्षणे असल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव