शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करून येणाºया देशी-विदेशी पक्ष्यांची मेहरूण तलावाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 16:30 IST

अधिवास नष्ट केल्याचा परिणाम: तलावात मानवी हस्तक्षेप, वावर कारणीभूत

ठळक मुद्दे ९५ प्रकारचे पक्षी यायचे पक्ष्यांचा अधिवास केला नष्टमानवी हस्तक्षेप वाढला

जळगाव: मेहरूण तलावाच्या खोलीकरण व सुशोभिकरणाच्या नावाखाली केलेले खोदकाम व भराव तसेच तलावात वाढलेला मानवी वावर यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करून येणाºया देशी व विदेशी पक्ष्यांनी तलावाकडे यंदा पाठ फिरविली आहे. परिसरातही केवळ स्थानिक पॉण्ड हेरॉन, पाणकावळा आदी ४-५ प्रकारचेच पक्षी तेही अगदी तुरळकपणे दिसून येत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक प्रा.राजेंद्र गाडगीळ यांनी ‘लोकमत’ला दिली.मेहरूण तलाव परिसरात इतर पाणवठे नसल्याने व जे आहेत ते प्रदूषित असल्याने शिरसोली रस्त्यावरील छोट्या तलावाकाठी मोरश्ेराटी, ब्राह्मीबदक आदी चारपाच  प्रकारचे पक्षी आलेले आहेत. मात्र त्यांची संख्याही फार नाही.९५ प्रकारचे पक्षी यायचेपूर्वी मेहरूण तलाव हे पक्ष्याचा मोठा अधिवास क्षेत्र होते. हिवाळा सुरू झाला की पूर्व युरोप, सैबेरिया, आफ्रिका आदी देशांमधून तसेच हिमालयातूनही सुमारे ९५ प्रकारचे पक्षी मोठ्या संख्येने स्थलांतर करून यायचे. त्यात ३०-४० प्रकारचे स्थानिक पक्षीही असायचे. मोठमोठ्या थव्याने हे पक्षी मेहरूण तलावाच्या परिसरात काही दिवस आश्रय घेत. तलावातील पाणवनस्पतींवर बसून पाण्यातील किडे, मासे यांची शिकार करीत.पक्ष्यांचा अधिवास केला नष्टमेहरूण तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू झाल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून तलावावर स्थलांतर करून येणाºया पक्ष्यांच्या संख्येत घट होत होती. हीबाब निदर्शनास आणून देऊनही मनपाने त्याकडे दूर्लक्ष करीत तलावात मानवी हस्तक्षेप सुरूच ठेवल्यामुळे  पक्ष्याच्या अधिवास नष्ट झाला आहे. पक्ष्यांना बसण्यासाठी पाण्यात असलेले उंचवटे नष्ट झाले आहेत. तसेच पक्ष्यांना बसण्यासाठी अंडी घालण्यासाठी आवश्यक झाडोरा (पाण्यातील झुडपे) नष्ट झाली आहेत. त्यामुळे यंदा मेहरूण तलाव परिसरात स्थलांतर करून पक्षी आलेच नाहीत.मानवी हस्तक्षेप वाढला तलावाच्या हद्दीत भराव घालून रस्ता करण्यात आला आहे. आता हा रस्ता आणखी रूंद करण्याचा घाट घातला जात आहे. तलावाच्या लगतच्या रहिवाशांनी अनेक वर्षांपासून सांडपाणी तलावातच सोडले आहे. ही बाब निदर्शनास आणूनही मनपाकडून तलावात येणारे सांडपाणी बंद झालेले नाही. गाडगीळ यांनी सांगितले की, काही लोकांनी तर लपून-छपून सांडपाणी तलावात सोडले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही काहीही उपयोग झालेला नाही.