शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष बदलाचा तूर्त विचार नाही -एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 17:09 IST

पक्ष बदलासाठी आपल्याला आॅफर असली तरी अद्यापही आपला पक्ष बदलाचा कोणताही विचार नाही.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच कोणताही विषय होतो असा कोणताही विषय नाही

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : पक्ष बदलासाठी आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या तिन्ही पक्षांची आॅफर असली तरी अद्यापही आपला पक्ष बदलाचा कोणताही विचार नाही. पक्ष बदल करायचा असेल तर कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागते, मात्र असा कोणताही विषय नसल्याने कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचादेखील प्रश्न निर्माण होत नाही, असे स्पष्ट मत माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले.एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पुस्तक प्रकाशनाच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेला शाब्दिक हल्ला, यातून खडसे यांनी संकेत दिले असले तरी अद्यापपावेतो कोणताही निर्णय घेतलेला नाही. पक्ष प्रवेशासंदर्भात आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू होती. मात्र खडसे यांची भेट घेतली असता ते आपल्या मुक्ताईनगर येथील खडसे फार्महाऊसवरच नेहमीप्रमाणे उपस्थित होते. उलट माझ्या पक्ष प्रवेशाची आपल्याला काही माहिती असेल तर मला नक्की कळवा, असे मिश्किल उत्तरही त्यांनी दिले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्याशी यासंदर्भात विचारणा केली असता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. माजी मंत्री खडसे आणि अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्यामधील गेल्या पाच पंचवार्षिक निवडणुकांमध्ये रवींद्र पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना विचारणा केली असता निवडणूक अजून पुढे आहे. पक्षश्रेष्ठीचा निर्णय अंतिम असेल या शब्दावर मात्र ते ठाम राहिले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते विनोद तराळ यांची प्रतिक्रिया घेतली असता अजित पवार यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम आहे. त्यामुळे अजित पवार सांगतील तो निर्णय मला मान्य असेल एवढेच नव्हे तर अद्यापपर्यंत त्यांचा कोणत्याही पक्ष प्रवेशासंदर्भात विषय समोर आलेला नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, खडसे यांच्या पक्ष प्रवेशासंदर्भात अजून कोणत्याही प्रकारची ठाम माहिती आलेली नाही. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही, असे मत व्यक्त केले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर