शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पावणेतीन वर्ष होऊनही सरकारच्या प्रतिमेत सुधारणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 19:47 IST

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेबाबत व्यक्त केली नाराजी: 105 महसूल कर्मचारी, अधिका:यांचा केला गौरव

ठळक मुद्देमुख्यमंत्री पहाटे 3 ला झोपतात गुलामांसाठीचा महसूल कायदा बदलणारशेतक:यांना फिरवू नका, त्यांचा शाप लागतो

लोकमत ऑनलाईन जळगाव, दि.14- राज्य सरकारला पावणे तीन वर्ष झाले. शासन लोकहिताच्या नवनवीन योजना आणत असतानाही सरकारच्या प्रतिमेत सुधारणा झालेली नाही. कारण लोकांचा संपर्क प्रशासकीय यंत्रणेशी, अधिकारी, कर्मचा:यांशी येतो. सरकारच्या योजना जनतेर्पयत पोहोचवणारे ते माध्यम, वाहक आहेत. तेच जर चांगले नसेल तर योजना पोहोचणार नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्न, समस्या मार्गी लावा, त्यांना फिरवू नका, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेविषयी नाराजीची भावना सोमवारी दुपारी नियोजन भवनात आयोजित महसूल कर्मचारी, अधिकारी गुणगौरव सन्मान सोहळ्यात बोलताना व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार उन्मेश पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते. इन्फो- मुख्यमंत्री पहाटे 3 ला झोपतात पालकमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागातील जिलतील उत्कृष्ट काम करणा:या 105 अधिकारी, कर्मचा:यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, गेल्या पावणेतीन वर्षात एकही दिवस मुख्यमंत्री फडणवीस हे पहाटे तीन वाजेपूर्वी झोपल्याचे आठवत नाही. जनतेसाठी नवनवीन योजना आणण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचा:यांनीही या योजना जनतेर्पयत पोहोचविण्यासाठी परिश्रम घ्यावेत. इन्फो- शेतक:यांना फिरवू नका, त्यांचा शाप लागतो शेतक:याला फिरवू नका. त्याचा शाप लागतो. कारण तो प्रामाणिक असतो. कर्मचारी, अधिका:यांना पगार चांगले आहेत. अजून काही मागण्या असतील तर सांगा. त्यादृष्टीने प्रय} करू. मात्र हे करत असताना तुमच्याकडूनही चांगल्या कामाची अपेक्षा असल्याचे चंद्रकांतपाटीलम्हणाले. इन्फो- दिवाळीर्पयत 43 हजार गावात दोषमुक्त ऑनलाईन सातबारा जळगाव जिलतील30 गावे पूर्णपणे दोषमुक्त ऑनलाईन सातबारा उपलब्ध असलेली झाली असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली. जिलचे 99.99 टक्के सातबारा ऑनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच उर्वरीत गावे देखील 2 महिन्यात दोषमुक्त ऑनलाईन सातबारा असलेली होतील, असे आश्वासन जिल्हाधिका:यांनी दिले आहे. राज्यातील सर्व 43 हजार गावे दिवाळीर्पयत दोषमुक्त ऑनलाईन सातबारा असलेली घोषीत होतील, अशी अपेक्षाही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. अशा गावांमध्ये तलाठय़ाकडे जाण्याची गरज भासणार नाही. किऑस्क मशिनवरून केवळ 20 रूपये भरून नायब तहसीलदारांची डिजीटल सही असलेला सातबारा मिळू शकेल. नागपुरात ही सुविधा सुरू झाली आहे. महिन्याला 9500 लोक त्याचा लाभ घेत असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. गुलामांसाठीचा महसूल कायदा बदलणार पालकमंत्री म्हणाले की, ब्रिटीशांना देशावर राज्य करण्यासाठी गुलामांसाठी महसूल कायदा केला होता. तो तेव्हापासून तसाच लागू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर कसे होईल? यादृष्टीने त्यात बदल करण्यात येईल. ते म्हणाले की, महसूलमंत्रीपदाचा पदभार घेतला तेव्हा त्यांच्याकडे सुनावणीसाठी 5 हजार केसेस प्रलंबित होत्या. त्या मार्गी लावण्यासाठी सल्लागार एजन्सी नेमली. आता आठवडय़ाला 100 कसेसेचा निपटारा करीत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात किती केसेस प्रलंबित आहेत? याची विचारणा केली असता अपर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी 350 केसेस असल्याचे सांगितले. त्यावर समाधान व्यक्त करीत या केसेस देखील लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी गरज भासल्यास खाजगी एजन्सीची मदत घ्या, असे सांगितले. तसेच गुलामांसाठी असलेला महसूल कायदा बदलासाठी प्रय} सुरू केले असून या कायद्यात परिवर्तन करण्याची इच्छा असलेल्या सेवानिवृत्त अधिका:यांची टीम त्यासाठी विनावेतन काम करीत आहे. दर अधिवेशनाला ते किमान 10-12 कायदे सुधारणेसाठी देतात. त्यानुसार आपण सुधारणा करीत आहोत, असे सांगितले. यापुढे प्रत्येक प्राताधिका:यांना महसूल कायद्याचे एक कलम (क्लॉज) देऊन त्याचा अभ्यास करायला लावणार. त्यात जनहिताच्या दृष्टीने काय बदल अपेक्षित आहे? याबाबत मत मागविणार. त्यादृष्टीने आव श्यक ते बदल केले जाणार असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी सावरली बाजू भाषणाच्या सुरूवातीलाच पालकमंत्र्यांनी पावणेतीन वर्ष झाले तरी राज्य सरकारची प्रतिमा सुधारत नसल्याचे विधान केले होते. मात्र नंतर बोलताना त्यांनी मोदी, फडणवीस यांची प्रतिमा मोठी आहे. लोक धबाधब मते देतात. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेची चिंता करू नका. मात्र तुमची प्रतिमा कशी चांगली होईल? याचा विचार करा असे सांगत बाजू सावरली.