अमळनेर : तालुक्यातील अमळगाव येथील लोकनियुक्त सरपंच छाया वसंत मोरे यांच्यावर १० सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून तहसीलदार मिलिंद वाघ यांनी २९ रोजी सकाळी ११ वाजता अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सभा बोलावली आहे.
अमळगाव ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती प्रवर्गाचा लोकनियुक्त सरपंच आहे. ग्रामपंचायतीत सरपंचसह १२ सदस्य असून रेखा संजय चौधरी, चंदना विश्वास पाटील, मिलिंद गुलाबराव पाटील, नाजूक बन्सीलाल पारधी, ललिता विलास चौधरी, रत्नाबाई रमेश चौधरी, नीलेश लक्ष्मण महाले, एकनाथ तिरसिंग भिल, सविता महेंद्र कुंभार,लीलाबाई नामदेव भिल आदींनी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्याकडे २४ रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
त्यावर तहसीलदारांनी २९ रोजी विशेष सभा बोलावली आहे.
दरम्यान लोकनियुक्त सरपंचावर सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर तो अहवाल तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवतील. त्यानंतर जिल्हाधिकारी ग्रामसभा आयोजित करतील. त्यात ग्रामसभेने जर सरपंचावर अविश्वास मंजूर केला तरच सरपंच अपात्र ठरविण्यात येतील. मात्र सरपंच अपात्र ठरल्यानंतर निवडणूक न घेता त्याच प्रवर्गाचा सरपंच ग्रामपंचायत सदस्यांमधून निवडण्यात येईल.