शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

सभापतीपदी नितीन बरडे बिनविरोध

By admin | Updated: October 15, 2015 00:24 IST

जळगाव : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी खान्देश विकास आघाडीचे उमेदवार नितीन मनोहर बरडे यांची बिनविरोध निवड झाली

गंगेच्या मातीची मूर्ती : हिंदू-मुस्लिमांचा एकोपा; शासनाचे मात्र दुर्लक्षअनंत बोबडे येवदायेथील एक गाव एक दुर्गा उत्सव गेल्या ३६ वर्षापासून नागरिक उत्साहात एकत्रित येऊन साजरा करतात. येथील गावकऱ्यांनी एकाच गावात वेगवेगळ्या ठिकाणी दुर्गा उत्सव साजरा करण्यापेक्षा संपूर्ण गावाने तो एकत्र येऊन दुर्गा उत्सव साजरा केल्यास गावातील एकता आणि अखंडता अबाधित राहून गावातील एकतेची शक्ती कायम ठेवण्याची परंपरा या गावाने जोपासली आहे. येथील दुर्गा उत्सवातील कार्यक्रम सुध्दा वाखान्याजोगा असतो. गेल्या ३५ वर्षापासून कोलकत्ता येथील मुर्तिकार साधन आचार्य या मंडळाला गंगेची माती आणून सुंदर देखनी मूर्ती तयार करतात. प्रदूषण रोखण्यासाठी मंडळाने मातीची मूर्ती तयार करुन प्रदुषणाला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने प्रदूषण रोखण्यासाठी लोकांना प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती तयार करण्याची बंदी जरी घातली असली तरी सुध्दा काही गावातील नागरिक प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीला अधिक पसंती देतात. या मंडळाने राष्ट्रीय एकोपा राखण्यासाठी रक्तदान, वृक्षारोपण, रोगनिदान शिबीरासारखे कार्यक्रम घेतले आहे. यंदा कुंजबिहारी महाराज यांच्या भागवत प्रवचनाचा कार्यक्रम सुरु आहे. या मंडळात सायंकाळची आरती परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेते. गावाने घालून दिलेल्या परंपरेमुळे सभामंडपात होणारी आरती एक सूर आणि एका तालात ऐकायला मिळते. या आरतीला दररोज हजारो नागरिक उपस्थित राहतात. यावर्षी दुर्गामातेचे मंदिर व रोषणाई लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दुर्गादेवी स्थापनेपूर्वी गावामधून दुर्गामातेची मिरवणूक काढून रस्त्यामध्ये पंचभाई पुऱ्यामध्ये रमजान शहावली दर्ग्यावर मंडळाचे पदाधिकारी दर्ग्यावर चादर चढवून मिरवणूक पुढे काढतात. त्यामुळे या गावामध्ये हिंदू-मुस्लिमांचा एकोपा पाहायला मिळतो. दुर्गा विसर्जनाच्या वेळेस मशीदजवळ मंडळांच्या अध्यक्षाचे मुस्लीम समुदायाच्या वतीने शाल व श्रीफळ देवून स्वागत केले जाते. यावर्षी सुध्दा नऊ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सुभाषराव कदम व मिनाक्षी कदम, श्याम ठाकरे व अर्चना ठाकरे या दाम्पत्यांना दुर्गा पुजेचा मान मिळाला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवदुर्गा मंडळाचे अध्यक्ष बंडू झटाले आदी परिश्रम घेत आहेत.