शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतर्फे तीन दिवसात नऊ लाखांचा परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 23:24 IST

रेल्वेतर्फे तीन दिवसात नऊ लाख रुपये प्रवाशाना परत करण्यात आले.

ठळक मुद्देरेल्वे प्रवासासाठी आता दोन्हीकडील पत्ते आवश्यकप्रवाशाने लढवली अशीही शक्कल

भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे लॉकडाऊन काळात प्रवासासाठी तिकीट खिडकीवरून बुक करण्यात आलेले तिकीट रद्द करण्याची प्रक्रिया ८ जूनपासून सुरू करण्यात आली आहे. भुसावळ येथे दोन तिकीट खिडक्यावरून ८ ते १० जून या तीन दिवसात ७४० प्रवाशांनी तिकीट रद्द केले. यातून ९ लाखाचा परतावा रेल्वे प्रशासनाला करावा लागला, तर प्रवाशांना प्रवास करण्यासाठी स्थानिक व ज्या ठिकाणी प्रवास करणार आहे त्या व्यक्तीचा पत्ता आरक्षण फॉर्मवर टाकणे अनिवार्य करण्यात आले आहे.लॉकडाऊन उघडल्यानंतर रेल्वेत प्रवास करता येईल या आशेपोटी अनेक रेल्वे प्रवाशांनी रेल्वे तिकिट आरक्षित केले होते. मात्र रेल्वे प्रशासनाने राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात रेल्वेतून प्रवास करता येणार नाही, असे नियम टाकल्यामुळे तसेच इतर राज्यांमध्येही स्थानिक नियम असल्यामुळे अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यासाठी ८ जूनपासून तिकीट खिडकी उघडल्यानंतर रेल्वे स्थानकावर सुरक्षित अंतराचे पालन करून तिकीट रद्द केले. ८ जूनला पहिल्याच दिवशी ३७० तिकीटातून एक हजार प्रवाशांनी तिकीट रद्द केले. ९ रोजी २०० तिकीटातून ५०० प्रवाशांनी यात्रा रद्द केली, तर १० जून रोजी १७० तिकीटवरून ४९० प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट रद्द केले.८ ते १० जून दरम्यान ६४०तिकीटतून दोन हजार प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन रद्द केले. यातून आठ लाख ९० हजाराचा परतावा रेल्वे प्रशासनाला करावा लागला.भुसावळ रेल्वे आरक्षण कार्यालयात चारपैकी १ व ३ क्रमांकाच्या तिकीट खिडक्या सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उघड्या आहेत. ज्या प्रवाशांनी १ ते १५ मे दरम्यान तिकीट बुक केले होते, त्यांना १४ जूनपासून पुढे सहा महिन्यापर्यंत तिकीट खिडकीवर तिकीट रद्द करता येतील. १५ ते ३१ मे दरम्यान केलेले तिकीट बुक रद्द करण्यासाठी २१ जूनपासून पुढे सहा महिन्यापर्यंत तर १ जून ते ३० जूनपर्यंत तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना २८ जूनच्या पुढे सहा महिन्यापर्यंत तिकीट रद्द करता येतील. प्रवाशांनी तिकीट खिडकीवर गर्दी करू नये. प्रवाशांना तिकिटाची पूर्ण रक्कम अदा करण्यात येईल, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.प्रवाशांनी लढवली शक्कल भुसावळपर्यंत प्रवासासाठी बुऱ्हाणपूर तिकीटमहाराष्ट्रमध्ये दिवसेंदिवस वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या बघता राज्यामध्ये कोणीही प्रवासी जिल्हाअंतर्गत रेल्वेने प्रवास करू शकत नाही. मात्र इतर राज्यांमध्ये प्रवास करू शकतो. या नियमात भुसावळ, जळगाव, बुलढाणा या जिल्ह्यातील प्रवास्यानी शक्कल लढवत पुणे, मुंबई व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून भुसावळ ,जळगाव बुलढाणाकडे येण्यासाठी भुसावळ राज्यांतर्गत असल्यामुळे नियमानुसार तिकीट मिळत नाही. यामुळे जवळपास असलेल्या मध्य प्रदेशच्या बऱ्हाणपूर शहराचे तिकीट काढून बराहणपुरला आल्यानंतर खासगी वाहनाने आपल्या गावी परत येत आहे, अशाप्रकारे प्रवाशांनी शासनाच्या नियमावर मध्यप्रदेश या ठिकाणी महाराष्ट्राच्या ठिकाणी मध्यप्रदेश बऱ्हाणपूर उतरण्याची शक्कल लढवली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ