आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर,दि.५ - बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश यास सोमवारी गोरखपुर येथील वसतिगृहात कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत तो घरी पोहचणार आहे.नीलेशला परत आणण्यास तयार केलेल्या पोलीस पथकात साहाय्यक फौजदार निकम, हवालदार कांतीलाल केदारे व त्याचे वडील रेवाराम भिल्ल शनिवारी येथून खाजगी वाहनाने गोरखपूर येथे रवाना झाले होते. सोमवारी पहाटे गोरखपूर पोहलचल्यानंतर स्नेहालय खुले आश्रलय येथे नीलेश सोबत त्यांची भेट झाली. आश्रलयाचे संचालक फादर वर्गीस थॉमस व समन्वयक फादर जोबी व कर्मचारी आणि वसतिगृहातील बालकांच्या उपस्थितीत त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. गोरखपुर महिला व बालकल्याण समितीच्या कार्यालयात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गोरखपुर येथून निघालेला नीलेश पोलीस पथकासह मंगळवारी घरी पोहोचणार आहे.
बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश आज पोहचणार मुक्ताईनगरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 21:10 IST
बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश यास सोमवारी गोरखपुर येथील वसतिगृहात कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत तो घरी पोहचणार आहे.
बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश आज पोहचणार मुक्ताईनगरात
ठळक मुद्देपोलिसांचे पथक खाजगी वाहनाने झाले गोरखपूरकडे रवानास्नेहालय खुले आश्रलयात झाली नीलेशची भेटकायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत नीलेश निघाला घराकडे