जळगाव : क्र ॉम्प्टन कंपनीने फिडरचे चुकीच्या पद्धतीने केलेल्या वर्गीकरणामुळे महावितरणला तांत्रिक अडचणी येत होत्या़ हा पेच सुटेर्पयत आणि फिडरवरील भाराचे पुनर्मूल्यांकन होईर्पयत रात्रीचे भारनियमन शहरासह तालुक्यात बंद करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आह़े किमान एक महिना याचा वीज ग्राहकांना लाभ होणार आह़े पुनमरूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आश्यकतेनुसार भारनियमन सुरू केले जाणार असल्याचे मुख्य अभियंता ज़ेएम़ पारधी यांनी सांगितल़े केंद्र वाढविणार विजेची बिले भरण्यासाठी असलेली महावितरणची व्यवस्था ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत असून तासन्तास रांगेमध्ये उभे रहावे लागत आह़े नागरिकांना होणारा हा त्रास लक्षात घेता दोन एटीपी मशिन मागविण्यात आले आहेत़ पैकी एक मशिन रिंगरोड तर दुसरे मशिन हे दीक्षितवाडी कार्यालयात बसविले जाणार आह़े तसेच काही दिवसांमध्ये दोन नवीन वीजबील भरणा केंद्र शहरात सुरू होणार असल्याची माहिती दिली.
रात्रीचे भारनियमन बंद
By admin | Updated: October 11, 2015 01:10 IST