अमळनेर : बेकायदा गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या पुण्याच्या चौघा आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तिघे सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले असून, वेळीच पिस्तूल व त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. दि. २० रोजी रात्री स्टेट बँकेजवळ पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सुनील हटकर, भटूसिह तोमर, रवी पाटील, दीपक माळी, राजेंद्र कोठावदे, विलास बागुल, मधुकर पाटील या पोलिसाना तैनात करून चारचाकी वाहन (एमएच १२ टीडी ६७९१) हिला अडविले असता त्यात पंकज ऊर्फ बंटी शंकर भूमकर (२५, नरेअंबेगाव, जि. पुणे), मनोज ऊर्फ मयूर भाऊसाहेब गायकवाड (२५, चिखली जाधववाडी, हवेली, जि. पुणे), ओंकार प्रकाश नाने (२८, द्वारका निवास, इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे), प्रशांत शिवाजी गुरव (३८, संत तुकारामनगर, भोसरी पुणे) हे चौघे आढळून आले.
चौघांची सखोल चौकशी केली असता, तिघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, हद्दपार, दारू विक्री, घरफोडी आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ही गुन्हेगार टोळी असून पोलिसांनी वेळीच पायबंद घातल्याने पुढील अनर्थ टळला आहे. आरोपीना पारोळा न्यायालयात हजर केले असता, न्या. पी. एन. पाटील यांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
210721\21jal_14_21072021_12.jpg
मुद्देमालासह पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, भटू सिंग तोमर, सुनील हटकर, दीपक माळी, रवींद्र पाटील. (छाया : अंबिका फोटो)