शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी केली स्थानकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 17:38 IST

भुसावळ विभागाचे नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सर्व फलाटांची शुक्रवारी पाहणी केली. प्रवाशांनाबद्दल सुविधांचे बारकाईने निरीक्षण करून आवश्यक ठिकाणी सुविधा पुरवण्याचे सूचना केल्या.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सुख सुविधेचे केले निरीक्षणअधिकाऱ्यांना केल्या सूचना

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ विभागाचे नवनियुक्त डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच भुसावळ रेल्वेस्थानकाच्या सर्व फलाटांची शुक्रवारी पाहणी केली. प्रवाशांनाबद्दल सुविधांचे बारकाईने निरीक्षण करून आवश्यक ठिकाणी सुविधा पुरवण्याचे सूचना केल्या.पदभार स्वीकारल्यानंतर डीआरएम गुप्ता यांनी प्रथमच सर्व फलाटांची पाहणी केली. यात स्वयंचलित जिने, फूट ओव्हर ब्रिज, लिफ्ट सुविधा याबद्दल माहिती घेतली. सकाळी दहा ते दुपारी दीडपर्यंत स्थानकासह दक्षिणेकडील व उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या वाहनतळाची ही पाहणी केली.वेटिंग रूम व स्थानकावर चार्जिंग पॉइंट वाढवण्याची केल्या सूचनाभुसावळ रेल्वे स्थानकावर फलाटांची संख्या व प्रवासी गाड्यांची संख्या बघता चार्जिंग पॉईंट त्या मानाने फारच कमी आहेत. वेटिंग रूममध्ये तसेच फलाटांवर चार्जिंग पॉईंट वाढवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.संपूर्ण फलाटांवर शेड उभारण्याच्या सूचनाफलाटाच्या लांबीच्या तुलनेत शेड पूर्णत: आच्छादन दिलेले नाही. गाडी आल्यानंतर इंजिनकडील डबे व शेवटचे डबे हे ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी शेड नसल्यामुळे उन्हाळ्यात, पावसाळ्यात प्रवाशांना तात्कळत उभे राहावे लागते. यासाठी संपूर्ण फलाटावर शेड उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या.नवीन फलाटावर पेयजल वर शेड टाकण्याची सूचनानुकतेच रेल्वे स्थानकावर दोन नवीन फलाटांची उभारणी झाली या ठिकाणी असलेल्या पेजवर शेड नसल्यामुळे प्रवाशांना तीव्र उन्हामध्ये पिण्याचे पाणी भरावे लागते. शेडवर पेयजला वर शेड टाकण्याच्याही सूचना करण्यात आल्या.स्थानकावर पाण्याचा वापर काटकसरीने करून स्वच्छतेविषयी तसेच स्थानकाबाहेर दक्षिणेकडील प्रवेशद्वारासमोर असलेल्या नवीन उद्यानाची पाहणीही करण्यात आली. प्रसंगी सर्व विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.दरम्यान, तत्कालीन डीआरएम आर.के.यादव यांच्या कार्यकाळात झपाट्याने झालेल्या विकास कामातील काही कामांना ब्रेक लागला असून, यात उद्यान निर्मितीसह रेल्वे स्थानकासमोरील चौक आखणीचे कार्य प्रलंबित झाले आहे. नवनियुक्त डीआरएम गुप्ता यांनी याला गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ