शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात व्यापा-यांना ‘शॉप अॅक्ट’पासून मुक्ती !, अस्थापनांना मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 12:28 IST

राज्यभरातील 10 लाख व्यापा-यांना दिलासा

ठळक मुद्दे कालबाह्य कायदा रद्द करण्यासाठी जळगावातून पुढाकारअधिसूचना जारी

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 17-  व्यवसायासाच्या परवान्यासाठी वेगवेगळ्य़ा कागदपत्रांची पूर्तता करण्याची क्लिष्ट प्रक्रियेसह  विविध जाचक अटींचा समावेश असलेला ‘शॉप अॅक्ट’ रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून नवीन वर्षापासून महाराष्ट्र दुकाने व अस्थापना कायदा 1948 रद्द होऊन महाराष्ट्र दुकाने व आस्थापना कायदा 2017 अस्तित्वात येणार आहे. नवीन वर्षात या कालबाह्य कायद्यापासून व्यापा-यांसह इस्पितळे व इतर अस्थापनांना दिलासा मिळणार असून या सर्वासाठी ती नववर्षाची भेट ठरणार आहे.  

 ‘शॉप अॅक्ट’ ही सर्वच व्यापा:यांसमोरील मोठी समस्या आहे. हा कायदा व त्यातील निकष कालबाह्य झाले असून यामुळे व्यापा:यांना विनाकारण वेठीस धरले जाते व यात सरकारचाही फायदा होत नाही, असे व्यापा-यांचे म्हणणे आहे.  या कायद्यामध्ये कामगारांवर नियंत्रण ठेवणे, वेळेचे र्निबध, दुकान साफसफाई, आठवडय़ातील एक दिवस सुट्टी तसेच परवान्यासाठी जागा मालकाची  संमती असे कागदपत्रे सादर करणे असे वेगवेगळे निकष आहेत. मात्र ते काळानुरुप कालबाह्य ठरले आहे.        

 शॉप अॅक्ट ‘ऑनलाईन’ होऊनही अडचणी कायम आहेया कायद्यांतर्गत व्यवसाय करण्यासाठी परवाना, दाखले घेण्यासाठी व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने ही प्रक्रिया ऑनलाईन केली. मात्र तरीदेखील जळगावसह राज्यभरातील  व्यापा-यांच्या अडचणी कायम आहे. कारण ही प्रक्रिया ऑनलाईन झाली असली तरी यामध्ये कागदपत्रांची पूर्तता करणे अत्यंत किचकट आहे. त्यामुळे परवाना नूतनीकरण होत नाही की नवीन परवाना मिळण्यासाठी अडचणी येतात. यामध्ये व्यवसाय करण्यासाठी जागा भाडय़ाने घेतली असेल तर जागा मालकाची संमती अथवा स्वत:ची जागा असल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांची संमती असेल तरच यामध्ये दाखला मिळतो. मात्र यामध्ये हा केवळ नोंदणी दाखला असला तरी  तरी अनेक जण त्याचा जागेचा पुरावा म्हणून वापर करू लागले. त्यामुळे जागा मालक संमती देण्यास तयार होत नाही. यामुळे ऑनलाईन कागदपत्रांची पूर्तता होत नाही व व्यवसायाचा दाखला मिळण्यास अडचण येते. या सोबतच आता वेळेचे, स्वच्छतेचे निकष व्यावसायिक पाळतातच. त्यामुळे हा कायदाच कालबाह्य ठरत आहे. 

कायदाच रद्द झाला तर व्यापा-यांचा प्रश्न मार्गीकायद्यातील निकष कालबाह्य झाल्याने हा कायदाच रद्द झाला तर व्यापा:यांचे प्रश्न मार्गी लागतील या विचाराने व्यापा:यांनी या विरुद्ध लढा सुरू केला. यापूर्वी  व्यापा-यांच्या एकतेमुळे स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) रद्द करण्यात फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेला (‘फॅम’) यश आल्यानंतर  ‘शॉप अॅक्ट’ हद्दपार करण्यासाठी व्यापा-यांनी दीड वर्षापूर्वीच पुढील लढा सुरू केला होता.

जळगावातून पुढाकारहा कायदा रद्द करण्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या जळगावातून सुरुवात झाली. यासाठी सर्वप्रथम फॅमचे राज्य उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सचिव ललित बरडिया व मंडळाच्या पदाधिका-यांनी यासाठी पुढाकार घेत ही बाब फॅमचे अध्यक्ष विनेश मेहता, सचिव आशीष मेहता यांच्या निदर्शनास आणून दिली व  पाठपुरावा सुरू झाला.अधिसूचना जारीफॅमच्या पाठपुरवाव्यानंतर सरकारने हा कायदा रद्द करण्याची अधिसूचना जारी केली असून कायद्याची प्रक्रिया सुरू आहे. नवीन वर्षात त्याचे कायद्यात रुपांतर होऊन तो लागू होणार असल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले. यास अधिका:यांनीही नाव न छापण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे. या संदर्भात कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी फॅमच्या पदाधिका:यांना अधिसूचना जारी झाल्याचे सांगितले असल्याची माहिती पदाधिका-यांनी दिली. यांना मिळणार दिलासानवीन कायद्यानुसार ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी कामगार आहे, त्या व्यवसायिकांना यातून मुक्ती मिळणार आहे. यामध्ये व्यापारी,  इस्पितळे,  वृत्तपत्रीय व मुद्रणकार्य, बॅकिंग, विमा, अभियंत्यांच्या, लेखापालांच्या व इतर अस्थापना असणा:यांचा समावेश राहणार आहे. कायदा रद्द झाल्यानंतर राज्यभरातील 10 लाख तर जळगावातील 4 हजार व्यापा-यांना यापासून दिलासा मिळणार आहे. सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त केले प्रसिद्धशॉप अॅक्ट कालबाह्य झाल्याने व्यापा:यांना येणा:या अडचणींसंदर्भात या कायद्यातील अडचणींबाबत फॅमचे अध्यक्ष विनेश मेहता यांची सविस्तर मुलाखत ‘लोकमत’ने 31 जुलै 2016 रोजी ‘आता ‘शॉप अॅक्ट’ हद्दपारसाठी लढा’ या मथळ्य़ाखाली वृत्त प्रसिद्ध केले  होते. 

शॉप अॅक्टमधील कालबाह्य झाला तरी तो व्यापा-यांसाठी त्रासदायक ठरत आहे. यातील जाचक अटींमुळे विनाकारण वेठीस धरले जाते. हा कायदा आज व्यावसायिकांसाठी कोणत्याच उपयोगाचा नाही की सरकारला यातून मोबदला मिळत नाही. त्यामुळे हा कायदाच रद्द करण्यासाठी फॅमच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू केला व त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली असून कामगार मंत्र्यांनीची याबाबत फॅमचे अध्यक्ष विनेश मेहता यांना  या बाबत माहिती दिली. - ललित बरडिया, उपाध्यक्ष, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र.