शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बंदिस्त नाट्यगृहाचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:27 IST

विश्लेषण

ठळक मुद्देउद्घाटनाविनाच खुले करण्याची नामुष्की पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे प्रशासनाची धावपळ

सुशील देवकरजळगाव: शहरातील सांस्कृतिक क्षेत्राची अनेक वर्षांची मागणी असलेले बंदिस्त नाट्यगृह बांधून तयार असतानाही त्याच्या उद्घाटनास विलंबामुळे, कधी तळघराला गळती लागल्यामुळे तर कधी उद्घाटनाविनाच घाईगर्दीत सुरू केल्याची घोषणा केल्याने चर्चेत राहिले आहे.आता हे बंदिस्त नाट्यगृह चालविण्याची जबाबदारी देखील जिल्हाधिकाऱ्यांवर तर देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर येऊन पडली आहे. मात्र या देखभाल दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे निधी खर्च करण्याची तरतूदच नसल्याने मिळेल त्या निधीतूनच काम करावे लागणार आहे. तर जिल्हाधिकाºयांना स्वत: यात लक्ष घालून नियमावली तयार करून घेण्यापासून ते डोअरकिपर ते व्यवस्थापकापर्यंत कर्मचारी वर्ग नेमण्याची प्रक्रियाही पार पाडण्याची वेळ आली आहे. हे नाट्यगृह चालविण्यासाठी मक्तेदारच न मिळाल्याने नाट्यगृहाचे लोढणे जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गळ्यात पडले आहे.तर मनपाने आधीच हात वर केले आहेत.उद्घाटनाविनाच खुले करण्याची नामुष्कीलोकांसाठी केलेल्या सुविधेचे उद्घाटन वारंवार लांबणीवर पडल्याने लोकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याने ती सुविधा उद्घाटनाविनाच खुली करण्याची वेळ दुसºयांदा आली आहे. यापूर्वी लांडोरखोरी वनोद्यानाचे काम पूर्ण होऊनही वनमंत्र्यांना वारंवार विनंती करूनही उद्घाटनाला यायला वेळ न मिळाल्याने लोकांना त्या सुविधेपासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे नाराजी व्यक्त होत होती. अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच ऐनवेळी जाऊन या लांडोरखोरी उद्यानाचे उद्घाटन केले. आता पुन्हा तीच वेळ बंदिस्त नाट्यगृहाच्या उद्घाटनाअभावी ओढावली. पालकमंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे उद्घाटन करण्याची घोषणा केली होती. मात्र शिक्षक मतदारसंघ, मनपा निवडणुक आचारसंहितेमुळे तसेच नंतर मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचे दौरे रद्द झाले. मराठा आरक्षण आंदोलनानंतर तर मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडलेलेच नाहीत. त्यामुळे त्यांची उद्घाटनासाठी वेळ मिळणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत किती दिवस हे नाट्यगृह बंद ठेवणार? असा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर पालकमंत्र्यांनी रविवार, २ सप्टेंबर रोजी अचानकपणे अधिकाºयांच्या बैठकीत दुसºया दिवसापासून बंदिस्त नाट्यगृह लोकांसाठी खुले करण्यात येत असल्याची घोषणा करून टाकली.प्रशासनाची धावपळपालकमंत्र्यांनी अचानक घोषणा करून टाकली मात्र बंदिस्त नाट्यगृहाची नियमावली देखील अंतीम झालेली नाही. तसेच त्याची देखभाल तसेच चालविण्याची जबाबदारी कोणावर द्यायची? याचा तसेच भाडे आकारणी किती करायची याचाही निर्णय झालेला नसतानाच दुसºया दिवसापासून नाट्यगृह खुले करण्याची घोषणा केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. स्वत: जिल्हाधिकारी हे नाट्यगृह चालविण्यास देण्यासाठी कर्मचारी नियुक्ती तसेच तिकिट आॅनलाईन विक्रीसाठी बँक प्रतिनिधींशी चर्चा आदी कामांमध्ये गुंतले असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीही अशाप्रकारचे आव्हान पेललेले असल्याने ते निश्चितपणे हे नाट्यगृह यशस्वी करून दाखवतील. मात्र त्यांच्याजागी बदलून येणाºया जिल्हाधिकाºयांनी हे त्यांचे काम नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली तर काय? असा सवाल निर्माण होत आहे.आर्थिक गणित सोडविण्याची कसरतया अवाढव्य वातानुकुलीत नाट्यगृहाचा वर्षभराचा देखभाल दुरूस्तीचा खर्चच ३० लाखांच्या आसपास असणार आहे. त्यादृष्टीने या नाट्यगृहातून उत्पन्न मिळणे आवश्यक आहे. या नाट्यगृहाचे भाडे जास्त असणार हे जाहीर असल्याने किती कार्यक्रम होतील? हे सांगणे कठीण आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी पार्र्कींगचा ठेका, कॅफेटेरिया, स्टॉल लावणे यासारख्या बाबींमधून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.