शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

सहकार गटाचे श्रेष्ठी ठरवतील ग.स.चा नवीन अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:34 IST

जिल्हा सरकारी कर्मचा-यांची पतपेढीच्या (ग.स.सोसयटी) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी शनिवारी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार गटाच्या श्रेष्ठींकडून प्रयत्न केले जात असून, सहकार गटाकडून शनिवारी श्रेष्ठींची बैठक घेवून या बैठकीतच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड केली जाणार असल्याची माहिती ग.स.च्या सुत्रानी दिली आहे.

ठळक मुद्देशनिवारी अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक :बिनविरोध होण्यासाठी सहकार गटाकडून प्रयत्नप्राथमिक शिक्षक व महिलेला संधी देण्याची मागणी

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.६-जिल्हा सरकारी कर्मचा-यांची पतपेढीच्या (ग.स.सोसयटी) अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी शनिवारी निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी  सहकार गटाच्या श्रेष्ठींकडून प्रयत्न केले जात असून, सहकार गटाकडून शनिवारी श्रेष्ठींची बैठक घेवून या बैठकीतच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड केली जाणार असल्याची माहिती ग.स.च्या सुत्रानी दिली आहे.

 १९ नोव्हेंबर रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षांनी आपले राजीनामे सहकार गटाचे अध्यक्ष बी.बी.पाटील यांना दिले. त्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून, अध्यक्षपद प्राथमिक शिक्षक संचालकाला देण्यात यावे यासाठी ग.स.च्या संचालकांकडून दबावतंत्र वापरले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध होवून कोणताही संचालक नाराज होणार नाही. याबाबत दक्षता घेतली जात आहे.

निवडणुकीपूर्वी सर्व संचालकांची होणार बैठकशनिवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीआधी सहकार गटाचे संस्थापक अध्यक्ष बी.बी.पाटील सर्व २१ संचालकांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत एका संचालकाची अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यात येणार आहे. सार्वानुमते ज्या संचालकाचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित केले जाणार आहे. मात्र संचालकांच्या बैैठकीत एका नावावर सहमती न झाल्यास दोन किंवा तीन संचालकांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आल्यास सहकार गटाच्या पक्षश्रेष्ठींची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत बी.बी.पाटील,  झांबर पाटील, डी.सी.पाटील, एस.एस.पाटील, उत्तमराव पाटील, वाय.झेड.पाटील, सुमन पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतच अध्यक्ष व उपाध्यक्षाचे नाव निश्चित केले जाणार आहे.

प्राथमिक  शिक्षक व महिलेला संधी देण्याची मागणीअध्यक्ष व उपाध्यक्षासाठी इच्छुक  संचालकांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. २१ पैकी १३ संचालक प्राथमिक शिक्षक असल्याने त्यांच्यापैकी एकाची अध्यक्षपदाची निवड व्हावी  यासाठी शिक्षक संचालकांकडून प्रयत्न होत आहेत. तर महिलांना संधी देण्याची मागणी देखील केली जात आहे. २१ संचालकांमध्ये रागिनी चव्हाण व विद्यादेवी कदम या महिला संचालक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे सहकार गटाने महिलेला संधी द्यावी अशी मागणीही काही संचालकांनी केली आहे. मात्र महिला संचालकाला अध्यक्षपद न देता उपाध्यक्षपद किंवा एखाद्या समितीचे प्रमुखपद देण्याची शक्यता अधीक असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर अनुभवी संचालकांला अध्यक्षपद देण्याचीही मागणी काही संचालकांकडून होत आहे.