शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा नवा उच्चांक , ३६ हजार ५०० रुपये प्रती तोळा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:00 IST

रशिया आणि चीनने सोन्याची खरेदी वाढविण्यासह भारतीय रुपयातील घसरणीचा परिणाम

जळगाव : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण तसेच रशिया आणि चीनने सोन्याची वाढविलेली खरेदी यामुळे सोन्याचे भाव नव्या उच्चांकावर पोहचून ते ३६ हजार ५०० रुपये प्रती तोळा झाले आहे. चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत.सोने-चांदीच्या भावावर आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच अमेरिकन डॉलर व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्यांचे भाव कमी जास्त होत असतात. अशाच प्रकारे सध्या रशिया व चीनने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारले आहेत.रुपयात सहा वर्षातील मोठी घसरणआंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढत असतानाच त्यात भरात भर म्हणजे भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे गेल्या सहा वर्षातील एकाच वेळी (एक रुपया १० पैसे) वाढलेले भावही कारणीभूत ठरत आहे. ५ आॅगस्ट रोजी ६९.६५ रुपयांवर असलेले डॉलरचे भाव ६ रोजी ७०.७५ रुपयांवर पोहचले. त्यामुळे सोन्याचेही भाव थेट ७०० रुपये प्रती तोळ््याने वाढले. ३५ हजार ८०० रुपये प्रती तोळा असलेले सोने वरील सर्व कारणांमुळे थेट ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहे. विशेष म्हणजे वस्तू व सेवा कर (जीएसटी) मिळून एक तोळा सोन्यासाठी ग्राहकांना ३७ हजार ३०० रुपये मोजावे लागत आहेत.‘आॅफ सिझन’मध्ये मोठी वाढयंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची तस्करी वाढून दलालांकडून सोन्यात कृत्रिम मागणी वाढली व जून महिन्याच्या शेवटी सोने ३४ हजार रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. त्यानंतरही भाववाढ अशीच सुरू राहून ११ जुलै रोजी सोने ३५ हजार रुपयांवर पोहचले होते. ही भाववाढ कमी न होता कायम राहत एक महिन्याच्या आतच सोन्यामध्ये दीड हजार रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते आता ३६ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहे. सोन्याच्या भावाचा हा उच्चांक असल्यचे म्हटले जात आहे.या पूर्वी सहा वर्षांपूर्वी सोने ३५ हजारावर पोहचले होते. त्यानंतर ते खाली आले होते व पुन्हा या वर्षी फेब्रुवारी २०१९मध्ये ते ३५ हजारावर पोहचले होते. आता तर थेट ३६ हजाराचा पल्ला सोन्याने ओलांडला आहे.चांदीचे भाव स्थिरसोन्याचे भाव वाढले असले तरी सध्या चांदीचे भाव ४१ हजार ५०० रुपये प्रती किलोवर स्थिर आहेत.रशिया व चीनने सोन्याची खरेदी वाढविल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढण्यासह भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या भावातील हा नवा उच्चांक आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन.सोन्याच्या भावात सध्या मोठी वाढ झाली असून सध्याच्या भावात जीएसटी मिळविल्यास ग्राहकास सोने प्रती तोळा ३७ हजार ३०० रुपयांपर्यंत पडत आहे.- सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक.

टॅग्स :Jalgaonजळगाव