शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीच्या पैशात सुरतला कुटुंबासाठी घेतले नवीन कपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 21:06 IST

चोरी करणारी बच्चे कंपनी ताब्यात : कोऱ्या नोटांमुळे फुटली बोंब

जळगाव : दिवसा घरफोडी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ताब्यात घेतले. या दोघांनी घरफोडी झाल्यानंतर थेट सुरत गाठले तेथे कुटुंबासाठी नवे कपडे, व दागिन्यांची विल्हेवाट आजीने लावल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, घरफोडीनंतर कोऱ्या नोटा इतरांना दाखविल्यामुळेच ही बोंब फुटली अन‌् दोघंही जाळ्यात अडकले.गणपती नगरातील वैभव स्टेट कॉलनीत कांतीलाल पृथ्वीराज वर्मा (वय ७१)यांचे बंद घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघड झाला होता. याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच वेळी तीन घरफोड्या झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी या गुन्ह्यांच्या तपासासाठी वेगवेगळे पथके नियुक्ती केले. भरदिवसा घरफोडीच्या गुन्ह्यासाठी सहायक फौजदार अशोक महाजन, प्रमोद लाडवंजारी व किरण धनगर यांचे पथक नियुक्त केले होते. या पथकाने घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढली असता अल्पवयीन मुलांचींही टोळी आहे व त्यातील एकाला काही महिन्यापूर्वी ताब्यात घेतले होते. त्यामुळे पथकाने त्याच शोध घेतला असता तो मुलगा व आणखी एक जण दोघंही सुरतला गेले आहेत व त्यांच्याकडे कोऱ्या नोटांचे बंडल होते, अशी माहिती मिळाली.सुरतहून येताच घेतले ताब्यातहे दोघं जण सुरतहून बुधवारी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर धनगर व लाडवंजारी या दोघांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. घरफोडीतील रोकडमधून सुरतला सात भावांसाठी तसेच कुटुंबासाठी नवे कपडे घेतले व दागिने सुरतच्या आजीने सराफाकडे मोडल्याचे त्यांनी कबुल केले. यात गुन्हा तर उघड झाला, मात्र रोकड व दागिने यापैकी काहीच मिळाले नाहीत. या पैशात त्यांनी उधळपट्टी केल्याचे उघड झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव