शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

कलाकृतीच्या जाणिवेसाठी नवी वाङ्मय सूत्रे मेंदूत पेरावी लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:25 IST

कलाकृतीच्या जाणिवेसाठी नवी वाङ्मय सूत्रे आपल्या मेंदूत पेरावे लागतील, असे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी नमूद केलंय. जळगाव येथे त्यांच्या उपस्थितीत नाट्य लेखन कार्यशाळा झाली. त्यात त्यांनी जळगावकरांना काय दिले या अनुषंगाने ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत आढावा घेताहेत अमळनेर येथील रंगकर्मी संदीप घोरपडे...

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, जळगाव जिल्हा शाखा आयोजित लेखन कार्यशाळा ज्यात सोबतीला होता जळगाव रोटरी क्लब़ही कार्यशाळा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी व पत्रकार महेश सुके यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे नाट्य विश्वाला पर्वणीच़ या लेखन कार्यशाळेचे स्वरूपही अतिशय उपयुक्त असे होते़ प्रत्येक सत्रात एका स्थानिक लेखकाचे नाट्यसंहिता वाचन व त्यावर उपस्थितांमध्ये चर्चा व शेवटी प्रेमानंद गज्वी यांचे मौलिक समग्र लेखन मार्गदर्शऩयात संहितावाचन, चर्चा, मार्गदर्शन स्वरूपाने तर उपस्थित लेखक, नवलेखक व रसिकही तृप्त झाला़ पण तृप्ततेच्या पलिकडेही लेखन कलेकडे पाहण्याचा तिसरा डोळाही प्रदान करण्यात आला़ त्याला आपण नाव देऊया दृष्टिकोन, स्थानिक लेखक शरद भालेराव लिखित बोला गांधी उत्तर द्या, वीरेंद्र पाटील यांचे झेंडूचे फुले व अमरसिंह राजपूत यांच्या द फोर्थ वे या संहितांचे वाचऩ व ह्या नाटकांचे विश्लेषण व लेखन प्रक्रिया समजावून सांगताना नाटककार प्रेमानंद गज्वी एकूणच जीवनाचे तत्त्वज्ञान खुलासेवर मांडून लेखकांना प्रोत्साहित करीत होते़ यात ते म्हणतात, माणसाइतकं विलक्षण असं या जगात दुसरं काहीही नाही व माणसाने कलेच्या अत्युच्च आविष्कारातून जीवन मूल्ये प्रकटावी व तीच जीवन मूल्ये पुन्हा- पुन्हा फिरून आकार देत असतात. मानवी जगण्यालाच़ त्यामुळे कलेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे़ समाजातील कुरूपता नष्ट करून मानवी जीवन सुंदर करणे़ प्रेमांनद गज्वी यांनी लेखकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी दिशादर्शन करताना सांगितले की, भूतकाळाचा चिकित्सक पद्धतीने अभ्सासपूर्ण मागोवा घेऊन वर्तमानाशी प्रामाणिक राहावे व भविष्याचा ज्ञानमय वेध घेऊन कलाकृतीची निर्मिती करावी़ तेव्हाच ती कलाकृती काळाच्या कसोटीवर चिरंतन टिकून राहील़ या दाखल्यासाठी त्यांनी आवर्जून लक्षात आणून दिले की, शेक्सपियर सर्वदूर, सदा सर्वकाळ टवटवीत का आहे? तर कलाकृतीचा पाया हा भक्कम तत्त्वावर उभा असेल तर कलाकृती कालबाह्य ठरणार नाही़ वाङ्मय प्रकार उलगडून दाखविताना गज्वी म्हणाले, अनेक प्रकारांना ओलांडून फक्त रंजनात्मक वाङ्मय, प्रयोगशील वाङ्मय, ज्ञानदर्शी वाङ्मय सर्व कलांना आपल्यात सामावून घेतात़ कारण कलाविश्वात प्रामुख्याने स्थापत्य कला, शिल्प कला, चित्रकला, नृत्य कला, संगीत कला म्हणून ओळखल्या जातात. पण आपण याला जोड देऊया शब्दकला अर्थात वाङ्मय कला. याचे शब्दकलेत तसे अनेक घटक आहेत- कविता, कथा, कादंबरी, नाटक आणि हे सर्व शब्दाप्रमाणे उभे राहतात़ म्हणून शब्दकला अर्थात वाङ्मय कल व त्यासाठी उपयुक्त अशी लेखनकला़़़़पे्रमानंद गज्वी नाट्यकलेतील सर्व विभागांना एक आणखी धक्का देतात़ नाट्यशास्त्रानुसार आंगिक, आहार्य, वाचिक व सात्विक. हे अभिनयाचे चार घटक मानले जातात. पण अभिनयाचा पाचवा घटक जो आजपर्यत अनेकांचे दुर्लक्ष असलेला घटक समोर आणतात. तात्विक अभिनय आणि हा तात्विक अभिनय असतो कलाकृतीच्या आशयात, अर्थात लेखनात़ कलाकृतीतील तात्त्विकता जेवढी प्रगल्भ तेवढी ती कलाकृती समृद्ध असते़ हा तात्त्विक घटक असतो कलाकृतीच्या आशयात तो सिद्ध होतो. नटाच्या आंगिक आहार्य, वाचिक, सात्त्विक अभियनातूऩ आणि यासाठीच तो नट हवा असतो़ अ‍ॅथलिट फिलॉसॉफर म्हणजेच तत्त्वचिंतक़ आणि फक्त अभिनयासाठी जो कलाकार तत्त्वचिंतक म्हणून सिद्ध होतो तर लेखन करणारा नाट्यकार एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लक्ष ठेवून लिखाण करीत असेल उदा़ नेपथ्य, प्रकाशयोजना, पात्रे, संवादस्वरूप शब्दांनुसार काळ वेळेच भान याकरिताच लेखकही तत्त्वचिंतकच हवा़ यात कोठेही रंगभूमी जुळवाजुळव खपवून घेत नाही अन्यथा पदड्याआड जातो़ समग्रतेचं भान देणारं वाङ्मय सिद्ध करायचं असेल तर आपली भूमी, आपला इतिहास, संस्कृती, जीवन मूल्ये नीट समजून घेऊन समग्रतेचं भान देणारं नवं स्वतंत्र वाङ्मय लिहावं लागेल. कलाकृतीच्या गर्भजाणिवेसाठी नवी वाङ्मय सूत्रे आपल्या मेंदूत पेरावे लागतील. ती पुढीलप्रमाणे वेदना, जाणिव, नकार, विद्रोह, करूणा, व्यक्ती विरुद्ध व्यक्ती, व्यक्ती विरुद्ध समाज, समाज विरुद्ध समाज, समाज विरुद्ध राष्टÑ, राष्ट्र विरुद्ध राष्ट्र, राष्ट्र विरूद्ध जग़ अशा प्रकारचं साहित्य शिंपण प्रेमानंद गज्वी यांनी महेश सुके यांच्यासोबत या कार्यशाळेतून जळगाव जिह्याला अनमोल भेट म्हणून दिलं़-संदीप घोरपडे, अमळनेर, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यAmalnerअमळनेर