शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नेरी येथे ‘पिग्मी’च्या १५ हजार रुपयांवर चोरट्याचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:48 IST

जामनेर पोलिसात तक्रार

नेरी, ता. जामनेर : येथील जामनेर रोडवरील ज्ञान पार्कमधील रहिवाशी ईश्वर पांडुरंग चौधरी यांच्या घरातून पंधरा हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांंनी लंपास केली. पतसंस्थेतील ग्राहकांच्या दैनंदिन जमा (पिग्मी) रकमेवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने चौधरी यांच्यावर संकट कोसळले आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.ईश्वर चौधरी हे नेहमी प्रमाणे मंगळवारी रात्री आपल्या घरात झोपलेले असताना घराच्या पुढील खोलीमधील सरकत्या खिडकीच्या काचा सरकवून बंद असलेला मुख्य प्रवेशद्वार आत मधून उघडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. खोलीमध्ये असलेल्या एका बॅगेतील रोख पंधरा हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. या वेळी इतर सामान चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकले. या प्रकरणी ईश्वर चौधरी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.ईश्वर चौधरी हे पहूर येथील एका पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून गावात काम करतात. मंगळवारी गावाचा नेरी येथील आठवडे बाजार असल्याने त्यांच्याकडे पंधरा हजार रुपये जमा झाले होते. दररोजची जमा झालेली रक्कम ते दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यालयात जाऊन जमा करतात. मात्र हीच रक्कम लंपास झाल्याने ईश्वर चौधरी यांच्या समोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.दीड लाख रुपये वाचलेशनिवार आणि रविवारमुळे पतसंस्थेचे मुख्य कार्यालय बंद असल्याने तीन ते चार दिवसांची जवळपास दीड लाख रुपये रक्कम चौधरी यांच्याकडे जमा झाली होती. मात्र रक्कम जास्त असल्याने त्यांनी मंगळवारी पहूर येथील मुख्य कार्यालयात जमा केली. मंगळवारी रात्रीच चोरीची घटना घडल्याने किमान दीड लाख रुपये तरी वाचू शकले. मात्र एका दिवसाचे पंधरा हजार रुपये गमावल्याचे दु:ख असल्याचे चौधरी म्हणाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव