शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवरील संकटांबाबत वेळीच उपाययोजना आवश्यक- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 14:09 IST

नगदी पिकांवरील या संकटांबाबत वेळीच उपाययोजना आवश्यक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

जळगाव - शेती व्यवसाय सध्या अडचणींचा होतोय. विदर्भ, खांदेशात गेल्या 2-3 वर्षात बोण्डअळीच्या संकटाने हाती आलेले सर्व पीक उद्ध्वस्त होतंय. उत्पादकता कमी होतेय. आज शेतकरी संकटात आहे. केळीच्या पिकावरही बाहेरील रोग उभा राहतोय. त्यामुळे नगदी पिकांवरील या संकटांबाबत वेळीच उपाययोजना आवश्यक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. पंजाबातही गव्हावर तांबेरा रोगाचे थैमान सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले. जळगाव येथे जैन व्हॅली येथे  पद्मश्री. डॉ. आप्पासाहेब पवार कृषी पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते.पवार पुढे म्हणाले की, दिल्लीत एका सत्ताधारी मंत्र्याने मला विचारले, पवार साहब आप हमेशा पैदा करनेवालेकी बात करते हो लेकीन लाखो खानेवाले है...  त्याला पवार म्हणाले, बराबर है, लेकीन पैदा करनेवाला उद्ध्वस्त हुआ तो खानेवाला क्या खायेगा? शेतकरी जगला तरच आपण सारे जगू, असे सूचविल्याचे ते म्हणाले.शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, त्याशिवाय इतर सर्व तत्वज्ञान व्यर्थ आहे. त्यामुळे शेतीमालाला योग्य भाव मिळेल, याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी, आशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. जर शेतीच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर पुन्हा निकृष्ट, परदेशी मिलो खाण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.फूड इन्फलेशन ... शेतमालाचे भाव वाढले तर महागाई वाढते. खतांच्या किंमती वाढल्या तर महागाई कमी होते, ही राजधानीतील तज्ञ मंडळींची विचारधारा व मानसिकता बदलण्याची गरज आहे. दिल्लीत काहीही उगविले, पिकविले जात नाही मात्र, दिल्लीकरांना सर्व स्वस्तात हवे असते. शेतीप्रश्नांची, बळीराजाच्या समस्यांची राजधानीतील नागरिकांना जाणीव नसल्याचे पवार यांनी नमूद केले.चांदवडसारख्या दुष्काळी तालुक्यातून शेतीत उत्तम काम करणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान होतोय, ही आनंदाची बाब आहे. आप्पासाहेब पवार व भंवरलालजी यांना हेच अपेक्षित होते. जैन समूहाने ही आधुनिक पीक क्रान्ती गावोगावी न्यावी, असेही पवार यांनी सूचविले.जळगावात जैन हिल्स वर येऊन गेल्या अनेक वर्षांतील स्नेही भंवरलालजी यांच्याशी आता संवाद होऊ शकत नाही, याचे मोठे दुःख असल्याचेही पवार म्हणाले.