शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आज गांधीची गरज, मात्र ‘गांधी’ तयार होणे कठीण - डॉ.भालचंद्र नेमाडेंनी व्यक्त केली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:40 IST

नाणार मलबार हिलवर करा

जळगाव : सध्याचा काळात मानवी मुल्य हरवत जात आहेत. मानवी मेंदूची उत्क्रांती थांबत जात असल्याने जगात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा काळात महात्मा गांधीची यांची गरज आहे. मात्र, मूल्य हरवत जाणाऱ्या समाजात गांधी निर्माण होणे कठीण असल्याची खंत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी बुधवारी डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी महोत्सव समारोप समारंभ निमित्त डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित कार्यक्रमात डॉ. नेमाडे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एन.के.ठाकरे हे होते. लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी, उपाध्यक्ष अरुण नारखेडे, सचिव एन.एस.पाटील, सहसचिव डॉ.डी.के.टोके, संचालक किरण बेंडाळे, व.पु.होले, डॉ.अरुणा पाटील, जी.ई.पाटील, प्रा.एल.व्ही.बोरोले, प्राचार्य डॉ.एस.एस. राणे उपस्थित होते. संस्थेच्या १०० वर्षाच्या ‘फोटो बायोग्राफी’चे प्रकाशन झाले.मुंबईपासून दिल्ली, लंडन सडत जात आहेनेमाडे म्हणाले की, मेंदूची उत्क्रांती थांबल्यामुळे प्रगती थांबली आहे. खानपानातील बदल, उलटा विचार करणाऱ्यांची वाढत जाणारी संख्या, यामुळे स्त्रियांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळेच सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील नागरिक हे सारखेच असतात, सर्व देशांमधील नागरिक हे प्रेमळ असतात. मात्र, राजकारण्याकडून राष्ट्र संकल्पना स्वार्थासाठी वापरली जात असून, राष्टÑ संकल्पना चुकीच्या पध्दतीने लोकांसमोर मांडली जात आहे. यामुळे मुंबईपासून, दिल्ली, लंडन हे सडत जात असल्याचेही नेमाडे यांनी सांगितले.निसर्गरम्य कोकणात रिफायनरी करण्यापेक्षा मलबार हिल वर करासध्या आपण मूल्य ठरविताना कोणताही विचार करत नाहीत. जे आवश्यक आहेत त्या मुल्यांना सोडून इतर मुल्य स्विकारण्याची धडपड सध्या सुरु आहे. निसर्गरम्य कोकणात रिफायनरी तयार करून त्या ठिकाणचा निसर्ग का नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे ? हे एक कोडं आहे. रिफायनरी तयार करायची असेल तर ती मलबार हिलवर तयार करा असा सल्ला नेमाडे यांनी दिला. निसर्गातील प्राणी, पक्षी, वृक्ष हे आज तर शिल्लक असतील किंवा त्यांचा बचाव होत असेल तर तो केवळ अडाणी समजल्या जाणाºया लोकांकडूनच होत आहे. तरे सुशिक्षित लोकांमुळे कोणतेही प्रयत्न निसर्ग वाचविण्यासाठी केला जात नसल्याचे दिसून येते.बेबीसीटर चालते मग सासू का नाहीनागरिकांनी आधुनिकतेतून काय घ्यावे आणि जुन्या पध्दतीतुन काय सोडावे यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या परंपरेत सर्व काही टाकण्यासारखे नाही असे मत नेमाडे यांनी व्यक्त केले. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचे खुळ वाढत चालले आहे. मातृभाषा जगवायला हवी. इंग्रजी ही विश्वभाषा नाही असे सांगून नेमाडे यांनी भाषेच्या विविध गमतीजमती सांगितल्या.स्व:तचे विचार बळकट करासध्या देशात राम मंदिर, नागरिकत्व कायदा अशा गोष्टींमुळे विचार करणाºयाला कळत नाही की आपण काय विचार करतो. आता वेळ आली आहे की, प्रत्येकाने आपल्या विचारपध्दतीत बदल करण्याचीत्न े. डॉ.एन.के.ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.मनीषा पाटील यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील, संघपती दलुभाऊ जैन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव