शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 19:17 IST

जमिनीचे आरोग्य ठणठणीत असेल तर सकस उत्पन्न मिळते. हे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी केवळ शेतक-यांची नव्हे तर आपल्या सर्वांची आहे.

ठळक मुद्देमृदादिनी माती संवर्धनाचा संकल्पआमदार मंगेश चव्हाण यांनी साधला संवाद

चाळीसगाव, जि.जळगाव : जमिनीचे आरोग्य ठणठणीत असेल तर सकस उत्पन्न मिळते. हे आरोग्य व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी केवळ शेतक-यांची नव्हे तर आपल्या सर्वांची आहे. आपण मातीचे पूजक आहोत. श्रमसाधनेने निर्सगही प्रसन्न होऊ शकतो. जागतिक मृदादिनी जमिनीचे आरोग्य जपण्याचा आपण संकल्प केला पाहिजे, असा संवाद आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे साधला.गुरुवारी जागतिक मृदादिनानिमित्त जनजागृती सोहळा पंचायत समिती मध्ये पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आयोजन पं.स.च्या कृषी विभागामार्फत करण्यात आले होते.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, तालुका कृषी अधिकारी सी.डी. साहेब, सहाय्यक गटविकास अधिकारी अजय पवार, आत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक ज्ञानेश्वर पवार, तंत्र सहाय्यक ए.आर.चंदिले, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य रमेश महाजन, धनंजय मांडोळे, अनिल नागरे, भय्यासाहेब पाटील यांच्यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.पुढील वर्षी मृदा संवर्धन सेवकांचा सत्कार करणारपुढे बोलतांना आमदार चव्हाण म्हणाले की, माती प्रयोगशाळेत तयार होऊ शकत नाही. मातीचा एक एक कण तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात . सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी सेंद्रीय शेतीचा आग्रह धरला पाहिजे. रासायनिक तत्वांचा वापर कमी करावा. माती साक्षरतेशिवाय हे शक्य नाही. कृषी विकासासाठी चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार असून पुढील वर्षापासून मोठ्या प्रमाणात मृदा दिन करण्यात येईल.

टॅग्स :FarmerशेतकरीChalisgaonचाळीसगाव