शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत ‘ईव्हीएम’वरच खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:31 IST

पुढील निवडणुका मतपत्रिकेवरच घ्या अथवा निवडणुकाच न घेण्याची मागणी करणारा ठराव

जळगाव : जळगाव मतदारसंघात गुलाबराव देवकर यांचा झालेला पराभव हा इव्हीएमचा घोळ असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला़ गिरीश महाजन हे छातीठोकपणे विजयाचे आकडे कसे सांगू शकतात? असा सवाल उपस्थित करून आगामी निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्या, अन्यथा निवडणुकाच घेऊ नका, अशा मागणीचा ठराव या बैठकीत करण्यात आला़ अनेक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली़लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता झाली़ जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले़ अनेक ठिकाहून ईव्हीएमच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़ आम्ही जेव्हा स्थानिक पातळीवर फिरतो तेव्हा शेतकरी वर्ग सांगतो आम्ही मतदान केलेले नाही, लोक सांगतात आम्ही मतदान केलेले नाही़ पहिल्या फेरीपासून गुलाबराव देवकर यांंना २५ ते २७ टक्के तर उन्मेश पाटील यांना ६४ ते ६६ टक्के हाच आकडा शेवटपर्यंत कायम कसा? किमान देवकरांच्या मतदारसंघात तरी फरक जाणवला असता़ त्यामुळे हा पराभव पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मान्य नाही. मात्र आपल्याकडे पुरावा नसल्याने आपण काही करू शकत नाही, त्यामुळे हे सर्व विसरून आता विधानसभेच्या कामाला लागावे, कार्यकर्त्यांनी निराश न होता, संघटना बळकटीकरणावर भर द्यावा, असे आवाहन रवींद्र पाटील यांनी केले़ कामे न करणाऱ्यांना पदे खाली करावी लागतील तसेच निवडणुकीसाठी नवीन कार्यकारिणी असेल, असे त्यांनी सांगितले़ दरम्यान, यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना पाटील यांनी इव्हीएमला विरोध करणारा ठराव मांडला़राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा गिरीश महाजनांपेक्षा नक्कीच अभ्यास जास्त आहे, मात्र, आजपर्यंत त्यांनी कधीच जागांच्या बाबतीत सांगितले नाही, मतमोजणीच्या काही तासांपूर्वी गिरीश महाजन यांनी अगदी छातीठोकपणे थोडावेळ थांबा भाजपच्या ४२ तर राष्ट्रवादीच्या ५ ते ६ जागा येतील, असे सांगितले होते़ते अस कस काय सांगू शकतात़, त्यामुळे निवडणुका बॅलेटपेपरवरच घ्याव्यात, अशी मागणी पदाधिकाºयांमधून झाली़ अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष गफफार मलिक हे होते़ माजी आमदार दिलीप सोनवणे, वाल्मिक पाटील, ज्ञानेश्वर महाजन, शीतल साळी, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला महानगराध्यक्षा निला चौधरी, माधुरी पाटील, उज्ज्वल पाटील, अरविंद मानकरी, रिझवान खाटीक, नईम खाटीक, अक्षय चौधरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती़भाजपच्या एका बड्या नेत्याचा फोन आला़ आम्ही आमच्या गाड्या जळगाव मतदारसंघात फिरवतो, तुम्ही फक्त रावेरमध्ये आम्हाला मदत करा़, असे असताना जळगाव मतदारसंघात उलटा निकाल कसा लागला? हे दुसर काही नसून हा ‘इव्हीएम’चाच घोळ आहे, असा गौप्यस्फोट एका पदाधिकाºयांनी या सभेत केला़ त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या़जळगावच्या मास्टरमार्इंंडची चौकशी व्हावीनिवडणूक आयोगाने इव्हीएम विरोधातील तक्रारींची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, यात जळगावचा मास्टरमार्इंड असून त्याच्याकडेही लक्ष देऊन चौकशी करावी, असाही सूर या बैठकीत पदाधिकाºयांकडून उमटला़ दरम्यान, ईव्हीएमला विरोध करण एकाबाजूने ठिक असले तरी आपण संघटनेकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असल्याचे अभिषेक पाटील म्हणाले़ २१ पक्ष या विरोधात न्यायालयात गेले होते़ संघटनेत कमी पडलो हे मान्य केले तरच पुढील निवडणुकांसाठी चांगले राहिल, असेही ते म्हणाले़ दरम्यान, नेते हे कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत, कार्यकर्ते अनेक वर्ष कुठल्याही स्वार्थाशिवाय झटत असतात, मात्र, एकदा का समोरील पक्षाच्याविरोधात वातावरण निर्माण झाले की आपण आता सत्ताधारीच झालो अशा भूमिकेत नेते राहतात, असे न करता कार्यकर्त्यांकडे लक्ष देऊन नेत्यांनी मदत करावी, अशी अपेक्षा जामनेरच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली़राष्ट्रवादीत सर्वच नेते कार्यकर्ते नाहीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्वजण नेते होत चालले आहेत़ कार्यकर्तेच शिल्लक नसल्याचे मुक्ताईनगरचे यु़डी़ पाटील म्हणाले़ कार्यकर्त्यांना जबादारी द्यावी, बूध कमिट्या मजबूत कराव्यात. एक बुथ १० यूथ ही संकल्पना राबवित असताना त्या युवकांनाच आपण समितीत आहोत हे माहित नसते़ जिल्हाध्यक्षांनी स्वत: मनावर घ्यावे, असेही ते म्हणाले़ ईव्हीएमविरोधात गावागावातून मोर्चे निघायला हवेत, असेही त्यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव