शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व खासदार रक्षा खडसे एकाच व्यासपीठावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 18:56 IST

कोथळी येथील श्रीराम मंदिर समर्पण निधी संकलन कार्यक्रम

मुक्ताईनगर : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी नोव्हेंबर २०मध्ये भाजप सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच ते त्यांची स्नुषा व भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या समवेत एकाच व्यासपीठावर आल्याने राष्ट्रवादी आणि भाजपसह अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निमित्त होते श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधी संकलन करण्याच्या कार्यक्रमाचे. दिनांक ३० जानेवारी रोजी सायंकाळी खडसे यांचे मूळगाव कोथळी येथील श्रीराम मंदिरात अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन करणेकामी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे तथा भाजपच्या खासदार रक्षा खडसे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार खडसे या माजी मंत्री खडसे यांच्या सून असल्या तरी खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जाहीर कार्यक्रमात पहिल्यांदाच दोन्ही नेते अर्थात सून व सासरे एकत्र आले. याप्रसंगी मात्र खडसे तथा खासदार रक्षा खडसे यांनी स्वतःचा व गावाचा निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक जितेंद्र जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी पंचायत समिती सभापती प्रल्हाद जंगले, माजी सरपंच नारायण चौधरी, उपसरपंच उमेश राणे, मुक्ताईनगर तालुका हिशोबप्रमुख कुणाल सोनार, तालुका कार्यवाह जितेंद्र जाधव, निधी संकलन सह प्रमुख दिनेश चव्हाण, रघुनाथ चौधरी, दामोदर पाटील, दामोदर राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, सालबर्डी येथे श्रीराम मंदिर निधी संकलन कार्यक्रम खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी सरपंच तृप्ती राणे, माजी सरपंच तुषार राणे, मुक्ताईनगर तालुका हिशोबप्रमुख कुणाल सोनार, तालुका कार्यवाह जितेंद्र जाधव, निधी संकलन सह प्रमुख दिनेश चव्हाण, पुनम झोपे, श्रद्धा झांबरे, शंकर जंगले, ललित खडसे, प्रभाकर झोपे, रमेश खाचणे, पुंजाजी झोपे, अनंता बऱ्हाटे आदी उपस्थित होते.