शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांशी एकनिष्ठ... अनिल पाटलांच्या वाट्याला मंत्रिपद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2023 16:19 IST

जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला तिसरं मंत्रिपद

प्रशांत भदाणे, जळगाव: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडलाय. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा एक गट सत्तेत सामील झाला आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या आमदारांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदासंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचाही समावेश आहे.

अजित पवारांचे कट्टर समर्थक आमदार म्हणून अनिल पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. पूर्वी भाजपमध्ये असणारे अनिल पाटील हे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. सुरुवातीपासूनच ते अजित पवारांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. 2019 मध्ये राज्याच्या सत्तासंघर्षात राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट नॉटरिचेबल झाला होता. त्यावेळेस पहाटेच्या शपथविधी वेळी अनिल पाटील हे अजित पवारांसोबतच होते. आता पुन्हा एकदा अजित पवार समर्थकांचा गट सत्तेत सहभागी झाला असून, आमदार अनिल पाटील हे अजित पवारांसोबतच आहेत. आता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला तिसरं मंत्रिपद आलं आहे. अनिल पाटील यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कोण आहे अनिल पाटील? अनिल पाटलांनी भाजपसोबत राजकारणाची सुरुवात केली

2014 मध्ये अमळनेर विधानसभा मतदासंघातून भाजपचे उमेदवार असताना पराभूत

त्यानंतर 2014 मध्येच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला

2019 मध्ये अमळनेर विधानसभा मतदासंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून निवडून आले

2019 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद 

आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री

अनिल पाटलांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे 10 वर्षे सभापती

जळगाव जिल्हा परिषदेचे 10 वर्षे सदस्य

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 15 वर्षांपासून संचालक 

जळगाव जिल्हा दूध संघात विद्यमान संचालक

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस