शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादीकडून स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 20:59 IST

जळगाव - अनेक महिन्यांपासून शहरातील खड्डयांमुळे नागरिक त्रस्त असताना मनपा प्रशासनाकडून कोणतीही दुरुस्ती होत नाहीय, त्यातच राष्टÑवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी ...

जळगाव - अनेक महिन्यांपासून शहरातील खड्डयांमुळे नागरिक त्रस्त असताना मनपा प्रशासनाकडून कोणतीही दुरुस्ती होत नाहीय, त्यातच राष्टÑवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी अभिषेक पाटील यांनी बुधवारी स्वखर्चाने गणेश कॉलनीपासून खड्डे दुरुस्तीची मोहीम हाती घेतल्यामुळे या मोहीमेचा धसका घेत मनपानेही याच रस्त्यावरून खड्डे दुरुस्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकीकडे राष्टÑवादी तर दुसरीकडे मनपाकडून रस्ता दुरुस्तीसाठी जुगलबंदी पहायला मिळाली.शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरातील सर्वच रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे. मनपातील सत्ताधाऱ्यांची खड्डे बुजविण्याबाबतची उदासीनता लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘माझा वार्ड, माझी समस्या’ या उपक्रमातंर्गत स्वखर्चाने खड्डे बुजण्यास सुरुवात केली. यावेळी रा.यु.काँ. महानराध्यक्ष अभिषेक पाटील, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, राजेश पाटील, राजेश मोरे, सलिम इनामदार, भरत कार्डिले, किशोर पाटील, प्रशांत राजपूत, राजदीप पाटील, किरण राजपूत, तुषार इंगळे, ममता सोनवणे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या ह्या उपक्रमाने खडबडून जागे झालेल्या मनपा प्रशासनानेही खड्डे बुजविण्यास सुरुवात केली असली तरी निकृष्ट पध्दतीने खड्डे बुजविण्यात येत असल्याचेच पहायला मिळाले.राष्टÑवादी कॉँग्रेसने सकाळी ९ वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी चौकापासून खड्डे दुरुस्तीस सुरुवात केली. काही खड्डे दुरुस्त करण्यात आल्यानंतर काही वेळातच मनपाचे खडीने भरलेले ट्रॅक्टर या ठिकाणी दाखल झाले. तसेच मनपाकडून देखील रस्ते दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली. राष्टÑवादीकडून पेव्हर ब्लॉक व कॉँक्रीटने रस्ते दुरुस्त होत असताना दुसरीकडे मनपाकडून डांबरने रस्ते दुरुस्त केले जात असल्याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळाली. गणेश कॉलनी चौक ते कोर्ट चौक पर्यंतच्या रस्त्यालगतचे खड्डे राष्टÑवादीकडून दुरुस्त करण्यात आले. तसेच रिंगरोडवरील देखील काही खड्डे दुरुस्त करण्यात आले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव