गुरुवारी दिवसभरात सुमारे दहा वर्षाच्या बालिकेसह अन्य आठ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेऊन लचका तोडला आहे. जखमी झालेल्यांना नशिराबाद आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अग्निहोत्री यांनी दिली. गेल्या पंधरवड्यापासून कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे जखमी झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. गेल्या तीन दिवसात पंधरा जणांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत. ग्रामपंचायत याची दखल घेणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नशिराबादला कुत्र्याने नऊ जणांचे तोडले लचके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST