शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नाशिकला बंदोबस्तास जाणाऱ्या पोलिसाचा रेल्वेतून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:17 IST

लासलगावजवळील घटना

जळगाव : नाशिक येथे राष्ट्रपती दौºयाच्या बंदोबस्तासाठी जात असताना महेंद्र सिताराम उमाळे ( ३० रा. चंदू अण्णा नगर, निमखेडी शिवार) या पोलीस कर्मचाºयाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी लासलगाव रेल्वे स्थानकावर घडली. उमाळे हे शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात कार्यरत होते.राष्टÑपती रामनाथ कोविंद बुधवार व गुरुवारी नाशिक दौºयावर आहेत. त्यासाठी नाशिक परिमंडळातून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. या बंदोबस्तासाठी महेंद्र उमाळे यांनाही पाठविण्यात आले होते. उमाळे बुधवारी जळगाव येथून भुसावळ येथे गेले. तेथून गोदान एक्सप्रेसने जात असताना लासलगाव स्थानकाजवळ तोल गेल्याने उमाळे गाडीतून खाली पडले व डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रेल्वे ट्रॅकवरील गँगमन यांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली.उमाळे याच्याकडे असलेल्या आयकार्डवरुन त्यांची ओळख पटली. यानंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात प्रकाराबाबत माहिती देण्यात आली. यानंतर कुटुंबियांना माहिती दिली. ते २०१४ मध्ये पोलीस दलात भरती झाले होते.जळगावातून निघाल्यावर तीन तासात मृत्यूची बातमीगोदान एक्स्प्रेसला जळगावला थांबा नसल्याने महेंद्र हे भुसावळ येथे गेले होते. तेथून दहा वाजेच्या सुमारास गाडीत बसले. अवघ्या तीन ते चार तासात त्यांच्या मृत्यूची जळगावात पोहचली. भाऊ व काही मित्र नाशिककडे तातडीने रवाना झाले. माहिती मिळताच उमाळे यांच्या वडीलांनी शहर पोलीस ठाणे गाठले. मानसिक धक्का बसेल म्हणून वडीलांना मृत्यू नव्हे तर केवळ अपघात झाल्याचे सांगण्यात आले होते. ठाणे येथे पोलीस दलात कार्यरत रमाकांत साळुंखे याने मित्र महेंद्रला ११.३० वाजता फोन केला होता. यावेळी रेल्वेत बसला असून नाशिकला बंदोबस्तासाठी जात असल्याचे त्याने सांगितले होत. यानंतर दीड वाजेच्या सुमारास रमाकांतला त्यांच्या मृत्यूची बातमीच समजली.दोन्ही चिमुकल्यांचे पितृछत्र हरपलेमहेंद्रच्या पश्चात्त आई, सिंधूबाई, वडील, भाऊ राहूल , पत्नी प्रतिभा व दोन मुले असा परिवार आहे. वडील सिताराम उमाळे गोलाणी मार्केटमध्ये घड्याळ रिपेअरींगचे काम करतात. तर लहान भाऊ राहूल हा दुकानावर काम करतो. महेंद्रच्या मृत्यूने अक्षय (४ वर्ष) व आरुष (वय ६ महिने) हे दोन्ही चिमुकल्याच पितृछत्र हरपले आहे. रात्री उशिरा मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह जळगावला हलविण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव