शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

‘हमसफर’ची अमळनेरला पाठ, पकडला नंदुरबारचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:38 IST

अमळनेरात थांब्यासाठी आंदोलनाचे हत्यार : खासदार ए.टी. पाटील उशिरापर्यंत थांबून

ठळक मुद्देहोळ ते दोंडाईचा मार्गाची चाचणी १४ आॅगस्टलानियोजीत थांबा अचानक रद्दप्रभूंच्या हस्ते आॅनलाइन लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर/ नंदुरबार : पश्चिम रेल्वेतर्फे रविवारपासून सुरू करण्यात आलेल्या वांद्रे टर्मिनस-पटना साप्ताहिक ‘हमसफर’ एक्स्प्रेसचा अमळनेर स्थानकावरील नियोजीत थांबा अचानक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जळगावच्या खासदारांसह प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचवेळी दुसरीकडे नंदुरबारला या गाडीला थांबा देण्यात आल्याने ‘हमसफर’ने अमळनेरची साथ सोडून नंदुरबारचा हात धरल्याची चर्चा आहे.अमळनेरात या गाडीला थांबा मिळावा, यासाठी भाजपाचे खासदार ए.टी. पाटील यांची रेल्वेच्या अधिकाºयांशी उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.अमळनेर, नंदुरबार येथून मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेमार्गावर थेट मुंबईला जाण्यासाठी प्रवासी गाडी सुरू करावी अशी प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती.त्यानुसार रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पात वांद्रे टर्मिनस-पटना या साप्ताहिक गाडीची घोषणा केली होती. ही गाडी वातानुकूलित असून, ती वापी, बलसाड, उधना, नंदुरबार, भुसावळ, इटारसील कटनी, मुगलसरायमार्गे जाणार आहे.या रेल्वेची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा तिला अमळनेर स्थानकावर थांबा मंजूर झालेला होता. त्यानुसार अमळनेरच्या रेल्वे वेळापत्रकाच्या फलकावर त्याची नोंदही घेण्यात आलेली होती. या नवीन गाडीचा शुभारंभ रविवारी मुंबईतून झाला. मात्र या गाडीला अमळनेरला थांबाच नसल्याचे काही कार्यकर्त्यांनी खासदार ए.टी.पाटील यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर खासदारांनी प्रयत्न सुरू केल्यावर यंत्रणा हलली.खासदार पाटील यांनी रेल्वेचे महाप्रबंधक ए.के. गुप्ता, पश्चिम रेल्वेचे प्रबंधक मुकुल जैन, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे सचिव पिंगळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या नवीन गाडीला अमळनेरला थांबा पूर्ववत ठेवावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अधिकाºयांकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे खासदारांचाही संताप झाला.तापी सेक्शनमध्ये केवळ उधना, नंदुरबार व भुसावळ येथेच या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. दर रविवारी पटना जाण्यासाठी रात्री साडेआठ वाजता नंदुरबारला तर सोमवारी मध्यरात्री पाऊण वाजता भुसावळला येणार आहे. लवकरच उधना-जयनगर अंत्योदय एक्स्प्रेस व वडोदरा-वाराणसी महामना एक्स्प्रेसचा समावेश आहे.यापूर्वी ही चाचणी ११ आॅगस्ट रोजी होणार होती. सोमवार, १४ रोजी सायंकाळी चार ते सात वाजेदरम्यान ही चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य अभियंता एस.सी.बैरवा यांनी दिली.अमळनेर ते होळ व नंदुरबार ते चिंचपाडा मार्गावरील दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाचे लोकार्पण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रविवारी दुपारी तीन वाजता आॅनलाइन करण्यात आले. आता या मार्गावर सर्वच प्रकारच्या रेल्वेगाड्या धावणार आहेत.