शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड येथे एकाच रात्रीत पाच घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:22 IST

धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे शुक्रवारी मध्य रात्रीनंतर तब्बल पाच घरे फोडून चोरट्यांनी साडे आठ तोळे सोने आणि १७ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदोन घरमालकांनीच पोलिसात गुन्हा दाखल केलातातडीने श्वान पथकाला पाचारण

धरणगाव/ नांदेड : धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे एकाच रात्री चोरट्यांनी पाच घरे फोडून साडे आठ तोळे सोन्याचे दागिने आणि साडे सतरा हजाराची रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्य रात्रीनंतर घडली.पोलीस सूत्रानुसार, नांदेड येथील रहिवासी दिनकर रामचंद्र वाणी यांच्या भरवस्तीत असलेल्या बंद घराचे लोखंडी दरवाजे गॅस कटरने कापून घरातील तिजोरी फोडून चोरट्यांनी जवळपास साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने व मोतीराम विठोबा भोळे यांच्या घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने व साडेसतरा हजाराची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविली. ही घटना ५ रोजीच्या मध्यरात्रीनंतर घडली. चोरट्यांनी नांदेडमधील एकूण पाच ठिकाणी घरफोडी केली. मात्र दोन घरमालकांनीच पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री नंतर नांदेड गावात हैदोस घातला. दिनकर रामचंद्र वाणी, मोतीराम विठोबा भोळे, डॉ. बंगाली यांचा दवाखाना, मनोज झोपे, पांडूरंग नामदेव रडे यांच्या बंद घरांचे लोखडी दरवाजे गॅस कटरने कापून घरातील चिजवस्तू चोरून नेल्या.यापैकी दिनकर रामचंद्र वाणी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात घरातील तिजोरीत असलेले दोन तोळ्याचे सोन्याचे एक लॉकेट, एकेक तोळ्याचे दोन लॉकेट, १७ ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा हार, २ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, १ ग्रॅम वजनाच्या चार अंगठ्या, ५ ग्रॅम वजनाची कर्णफुले असे एकूण साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे म्हटले आहे. या दागिन्यांची जुन्या बाजारभावाने एकूण किंमत ८८ हजार रुपये दाखविण्यात आली आहे. आजच्या बाजारभावाच्या हिशोबाने एक लाख ६५ हजाराचे हे दागिने चोरीस गेले आहेत.तर मोतीराम विठोबा भोळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या बंद असलेल्या खालच्या व वरच्या घरातून दिड तोळ्याची मंगल पोत, १ तोळ्याचे कर्णफूल, अर्ध्या तोळ्याचा सोन्याचा तुकडा व एकूण साडेसतरा हजार रुपयाची रोकड लांबविल्याचे म्हटले आहे.श्वानपथकाला पाचारण, डीवायएसपी घटनास्थळीया घटनेची माहिती मिळताच चोपडा विभागाचे डीवायएसपी विजयकुमार चव्हाण, धरणगावचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सपोनि गायकवाड, सहा.फौजदार गंभीर शिंदे,करीम सय्यद यांनी चोरीचा पंचनामा केला. यावेळी तातडीने श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पथकातील सपोनि सचिन गांगुर्डे, पो हे.कॉ. साहेबराव चौधरी यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

टॅग्स :theftचोरी