शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात तपासणीच्या नावाखाली तोतया पोलिसाने लांबविले वृध्दाचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 20:25 IST

पोलीस असल्याचे सांगून तपासणीच्या नावाखाली दोन भामट्यांनी प्रभातचंद हुकुमचंद जैन (वय ७८, रा. संगीता अपार्टमेंट, नेहरु चौक, जळगाव) यांच्याजवळील ५१ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता मनपा समोर घडली. दरम्यान,  हा तोतया पोलीस जैन हे मंदिरात दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली.याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे जळगाव मनपासमोर सकाळी आठ वाजेची घटनाचोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैदशहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

आॅनलाईन लोकमतजळगाव दि, १४ : पोलीस असल्याचे सांगून तपासणीच्या नावाखाली दोन भामट्यांनी प्रभातचंद हुकुमचंद जैन (वय ७८, रा. संगीता अपार्टमेंट, नेहरु चौक, जळगाव) यांच्याजवळील ५१ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी आठ वाजता मनपा समोर घडली. दरम्यान,  हा तोतया पोलीस जैन हे मंदिरात दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली.याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रभातचंद जैन हे रविवारी सकाळी ८ वाजता निलेश जैन यांच्या घरातील मंदिरात पुजा करण्यासाठी राहत्या घरातून पायी निघाले होते. महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले. ‘मी पोलीस आहे, माझे ओळखपत्र बघून घ्या, रात्री आम्ही तीन ते चार किलो गांजा पकडला आहे. त्यामुळे तपासणी सुरू आहे. मला तुमची तपासणी करायची आहे’ असे म्हणत जैन यांना  हातातील घड्याळ, सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी असा ऐवज काढून रुमालात ठेवायला सांगितले. पॅँटच्या खिशातील पैसे काढण्याच्या तयारीत असताच चोरट्यांनी दुसरा रुमाल त्यांच्या हातात देऊन तेथून धूम ठोकली. ते गेल्यानंतर जैन यांनी रुमाल तपासला असता त्यात काहीच नसल्याचे लक्षात येताच जैन यांनी डोक्याला हात मारुन घेतला.

चोरटे फुटेजमध्ये कैदवृध्दाला गंडविल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका ठिकाणच्या फुटेजमध्ये दोघं चोरटे कैद झाले आहेत. जैन यांनीही त्यांना ओळखले. या फुटेजच्या आधारावर पोलिसांनी चोरट्यांची माहिती मिळवली असून हा गुन्हा उघडकीस येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.