शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नैया

By admin | Updated: June 25, 2017 17:57 IST

स्केचबुक या माङया स्तंभासाठी काही एक रेखाटन मी आधी करतो. त्यानंतर त्याच्या अनुषंगाने योग्य असे शब्द लिहितो.

स्केचबुक या माङया स्तंभासाठी काही एक रेखाटन मी आधी करतो. त्यानंतर त्याच्या अनुषंगाने योग्य असे शब्द लिहितो. लगबगीने, घाईने अशासाठी की जे अनेक विचार स्केच काढताना रुंजी घालतात ते हवेत विरून नको जायला! समुद्र किनारी जी विशेष बारीक रेती असते, ती कितीही प्रयत्न केला तरी ओंजळीतून सारीच्या सारी घरंगळून जाते, आपणास ते माहिती आहे. बघा, किनारा मला अगदी समोर दिसतो आहे; पण तो वाटतो तितका जवळ नाही. वल्हवणे मला जरुरीचे आहे. लगेचच्या लगेच कागदावर शब्द उतरवणेसुद्धा! नाहीतर रेतीसारखे व्हायचे! वल्हवले नाही तर डुब ठरलेली! मी तसे ते आता करतो.
 
नाव, होडी, बोट, आगबोट, ती अजस्त्र टायटॅनिकसारखी जहाजे, हे सारे मी ज्या प्रदेशात राहतो. त्याच्या फार लांबवरचे आहे. समुद्र - किनारा आणि तेथे राहणे नशिबात नाही. कुतूहल मात्र तेव्हापासूनचे आहे जेव्हा अगदी लहानपणी कोणीतरी ती टिकटिक आवाज करणारी आणि परातीतील पाण्यात गोल - गोल फिरणारी आणून दिली होती. तिच्यात बसायचे आणि लांबवर पाण्यातून प्रवासास जायचे हे तेव्हापासूनचे स्वप्नच आहे, पण ते असो. मुद्दा हा की, फार आकर्षक असते समुद्र. तो बीच, त्या लाटा, त्या होडय़ा आणि नेव्हीचे. त्या किना:यावर आदळणा:या लाटांसारख्या आनंदाला देशावरचे पारखे असतात. माङयासारख्याला याची अजिबातच कल्पना नसते की, जमिनीवर आरामात राहणा:या माझी, जीवनाकडे बघण्याची दृष्टी त्या क्वचित दिसणा:या किना:यासारखी झाली आहे. जीवन समुद्रासारखे हवे - किनारा दिसत नाही पण तिथे पोहोचायचे तर असते! तो असतो पण नेटाने वल्हवायला लागते. मध्येच हातपाय गारठून उपयोग नसतो. समुद्रासारखे अथांग आणि खोल असे माङो प्रयत्न हवेत. आपणास सांगतो, आयुष्यातल्या कोणत्याही गहन प्रश्नाचे उत्तर खा:या पाण्यात दडलेले आहे. घाम, अश्रू आणि तो समुद्र हे ते खारे पाणी..! समुद्र किनारी राहणारे किंवा नदी - तिरी राहणारे आणि त्यावरच अवलंबून असणारे अनेक जन, काळजात शहाळी ठेवतात आणि फार आनंदाने जगतात. गाणी गातात. नाचतात, उत्सव मनवतात आणि गरजा अत्यल्प ठेवत सारखे सारखे समुद्राला भेटायला जातात. त्यांना ते दर्या सगळं काही देत असतो. मुख्य म्हणजे- सदा समाधान. चेह:यावर हसी - खुशी कोणी तांडेल, नाखवा, आगरी कधी उदास दिसला आहे? ‘दरिया - दिल’ हा शब्द उगीचच प्रचलित झालेला नाही!
समुद्र आणि जहाजे - होडय़ा, ती शिडाची गलबते, ते त्या वेळचे समुद्र - चाचे यावर मला आपल्याशी आणखीनही खूप बोलावेसे वाटते हिंदी महासागराइतके! समुद्रावरचे जीवन हे संपूर्ण बेभरवशाचे असते, पण ते कणखर बनवणारेही असते. मासे गावणार? माहीत नाही. होडी सुखरूप परत येणार? माहीत नाही. केव्हा तुफान उठणार? माहीत नाही. पण असे असताना हे नाखवे जायचे टाळतात का? नाही.. समुद्र त्यांच्यावर माया करतो. तोच सारे काही देतो - मोती, मासे आणि मनगट! समुद्राकडे नुसते उभे राहून बघत बसलो तर किनारा कधीच गवसणार नाही. त्यासाठी कोळी बांधवांना पाण्यात जावेच लागते. समुद्राची गाज आणि आत्म्याचा आवाज एक करावाच लागतो. ते भारी संगीत असते! शिडांवर किंवा हातातल्या वल्ह्यांवर अवलंबून असणारी ही नाखवा जमात, सगळ्यात जास्त टिकणार आहे असे मला वाटते. जहाजात पाणी आणि डोक्यात नकारात्मक विचार शिरले तर अंत निश्चित असतो. किना:यावर होडय़ा, जहाजे असतात आणि त्यांना कशाचाही धोका संभवतच नाही, अगदी सेफ असतात, तीपण मग त्यांचा काहीच उपयोगही नसतो.
असो. लांबत चालले आहे. एक छान कोट आहे. किनारा असतोच. साथी भेटतोच. बस् आपण आपले ‘माझी’ असायला हवे. आपली नैया तो केवट पार करणार आहे याची आपल्याला त्या सागराइतकीच गहिरी आणि खोलवरची आशा असायला हवी - दॅट्स ऑल.! - प्रदीप रस्से