जामनेर : उपजिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी जामनेर येथे भेट दिली असता त्यांनी घरोघरी जाऊन सर्वे झाला किंवा नाही याची पाहणी केली. तसेच नेरी येथील जनता हायस्कूलच्या कोरोना तपासणी कॅम्पला व जामनेर येथील काही खासगी रुग्णालय व ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलला भेट दिली. तसेच उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली.याप्रसंगी त्यांनी सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना सूचना केल्या की, आपल्या ओपीडीमध्ये जे रुग्ण येतात त्यांची कोरोना चाचणी करणे, कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक आहे. शासन आता सर्व सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या करीत आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या मतानुसार खासगी डॉक्टरांनी ओपीडीला येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे लपलेले रुग्ण सापडून साथ नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.याप्रसंगी तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारीजे.व्ही.कवळदेवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, मुख्याधिकारी राहुल पाटील, डॉ. सारिका भोळे, माया बोरसे, विक्रम राजपूत व आदी कर्मचारी उपस्थित होते.
माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा जामनेरात आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 21:01 IST