शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आता विकास दाखवावाच लागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:35 IST

केंद्र, राज्य एकाच पक्षाचे असूनही विकास कामे करवून घेण्यात अपयश आल्यानेच भाजपची झाली दमछाक, ईडीचा धाक आणि मेगाभरतीच्या वादळाने गोंधळलेला, गांगरलेला विरोधी पक्ष ताकदीने मैदानात उतरलाच नाही

मिलिंद कुलकर्णीअवघ्या चार महिन्यांपूर्वी खान्देशातील लोकसभेच्या चारही जागा मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या भाजपला घवघवीत यश तर सोडून द्या, २०१४ ची कामगिरीदेखील करता आली नाही. ईडीचा धाक आणि मेगाभरतीच्या वादळाने विरोधी पक्ष गोंधळलेला होता, तो जर मजबुतीने लढला असता तर भाजपची अवस्था आणखी बिकट झाली असती. मैदानात विरोधकच दिसत नाही, ही भाजप नेतृत्वाची शेखी किती फोल होती, हे निकालातून दिसून आले. विकास कामे न झाल्याने भाजप आणि शिवसेनेला हा फटका बसला आहे. आता कामे केली तरच धडगत आहे, असा स्पष्ट संदेश या निवडणुकीने दिला आहे.खान्देशातील निवडणुकीने काही बाबी ठळकपणे समोर आणल्या आहेत, त्याचा गांभीर्याने सर्वच राजकीय पक्ष, नेत्यांनी विचार केला तर पुढीच वाटचाल सुकर होणार आहे. अन्यथा यंदाच्या निवडणुकीपेक्षा बिकट स्थिती होण्याची वेळ फार दूर राहणार नाही.भाजपकडे दोन मंत्रिपदे होती. जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण ही महत्त्वपूर्ण खाती गिरीश महाजन यांच्याकडे तर पर्यटन, रोजगार हमी योजना, अन्न व औषधी प्रशासन ही खाती जयकुमार रावल यांच्याकडे होती. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपद होते. रावलांकडे नंदुरबार तर महाजन यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद होते. सेनेच्या दादा भुसे यांच्याकडे धुळ्याचे पालकमंत्रीपद होते.केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणला, विविध योजना खेचून आणल्या असा दावा या मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी केला. पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्टÑीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष यांनी प्रचार सभा घेऊन ७० वर्षे झाला नाही, एवढा विकास आम्ही पाच वर्षांत केला, असा दावा केला. परंतु, जनतेला तो पटलेला दिसत नाही. अन्यथा २० पैकी ८ जागांवर समाधान मानावे लागले नसते. शिवसेनेने जळगावात चांगली कामगिरी केली असली तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात खाते उघडता आलेले नाही, हे दुर्लक्षून चालणार नाही.विरोधी पक्षाचा विचार केला, तर भाजप-सेनेच्या वादळापुढे हे पक्ष सक्षमपणे निवडणुकांना सामोरा गेलेच नाहीत, असे वातावरण होते. राष्टÑवादी काँग्रेसने मुक्ताईनगरची खेळी वगळता अन्यत्र काही प्रयोगदेखील करुन पाहायचे नाकारले. काही जागांवर उमेदवारदेखील मिळाले नाही, बळजबरीने उमेदवारी देण्यात आली. अमळनेरचे अनिल भाईदास पाटील या तीन वर्षांपूर्वी भाजपमधून आलेल्या नेत्याने पक्षाला यश मिळवून दिले, हे लक्षात घ्यायला हवे.काँग्रेसची अवस्था त्या मानाने बरी आहे. आवाका ओळखून पक्षाने निर्णय घेतले आणि समाधानकारक कामगिरी केली. अर्थात ती पक्षाची किती आणि नेत्यांची वैयक्तिक किती हा प्रश्न संशोधनाचा ठरावा. अमरीशभाई पटेल आणि चंद्रकांत रघुवंशी, माणिकराव गावीत, शिवाजीराव दहिते हे दिग्गज नेते ऐन निवडणुकीत पक्ष सोडून गेले. धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा गड खिळखिळा झाला. शिरीष नाईक, के.सी.पाडवी आणि कुणाल पाटील हे तिन्ही उमेदवार हे पक्षापेक्षाही व्यक्तीगत आणि कौटुंबिक कर्तृत्वाने निवडून आले. रावेरमधून शिरीष चौधरी हेदेखील त्याला अपवाद नाही.निवडणुका संपल्या. आता पक्षभेद विसरुन खान्देशातील विकासविषयक मुद्यांवर काम झाले तरच पुढील निवडणुकीमध्ये जनता उभे करेल. अन्यथा भल्याभल्यांना आडवे केलेले आपण पाहिलेच आहे.पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा, ३७० कलम हटविणे या दोन मुद्यांभोवती निवडणूक केंद्रित करण्याचा भाजपचा प्रयत्न पुरता फसला. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, दळणवळणाची गंभीर झालेली समस्या, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोºया हे मुद्दे विरोधकांनी लावून न धरता देखील जनतेला या प्रश्नांवरील डोळेझाक पसंत पडली नाही. रस्त्यातील खड्डा बुजवता येत नाही, धड सुविधा देत नाही आणि किती दिवस कोट्यवधींच्या निधीच्या गमजा माराल, हे वास्तव त्यांच्यासमोर होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव