शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कोरोनाविरुद्ध मुक्ताईनगरात मुस्लिम युवकांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 16:14 IST

करणार समाजात जागृती व पोलिसांना सहकार्य

मुक्ताईनगर : कोरोनामुळे भारतातसंचारबंदी लागू केलेली असताना निजामुद्दीन येथील तबलीकी जमात प्रकरण घडून त्यात जवळपास साडेसहाशे बाधित मुस्लिम युवक आढळून आल्यानंतर विविध ठिकाणी त्याच्या गंभीर प्रतिक्रिया उमटल्याने मुक्ताईनगर येथील मुस्लीम युवकांनी मात्र पुढाकार घेत कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून समाजात जागृती करण्यासोबतच पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका स्वत: पोलीस स्टेशनला येऊन व्यक्त केल्याने हा कौतुकाचा विषय झालेला आहे.नगरसेवक शकील, मस्तान कुरेशी, शिवसेना जिल्हा अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख अफसर खान, शकूर जमदार, हारुन शेख, शकील मेंबर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खान इस्माइल खान, आरिफ आझाद, मुशीर मन्यार, जाफर अली, लुकमान बेपारी, युनुस मेहबूब, शरीफ मेकॅनिक, जहीर शेख, नूर मोहम्मद व वसीम शेख या प्रमुख मुस्लिम युवक व कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांची भेट घेत उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस, आरोग्यप्रशासन झटत असून त्यांना सहकार्य करणे तसेच शासनाच्या निर्देशानुसार मशिदीत गर्दी न करणे, अथवा कोणाकडे बाहेरील कोणी व्यक्ती आल्यास त्याची माहिती पोलीस स्टेशनला देणे आदी विषयावर त्यांनी चर्चा केली.या प्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले. पोलिस उपनिरीक्षक कैलास भारसके , पोलीस उपनिरीक्षक निलेश सोळुंके, मुकेश घुगे , अविनाश पाटील उपस्थित होते.